Breaking News

२२ जुलैला शिक्षक भारती करणार राज्यव्यापी पोस्टर आंदोलन शिक्षक संघटनेचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

१० जुलै २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने जारी केलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी शिक्षक भारती बुधवारी २२ जुलै २०२० रोजी एक दिवसाचे राज्यव्यापी पोस्टर आंदोलन करणार आहे.  जुनी पेन्शन मिळण्याचा आपला अधिकारी अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील मसुद्यात बदल सुचवणारी अधिसूचना रद्द होणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष शिक्षणमंत्री यांना शिक्षणाधिकारी द्वारा निवेदन बुधवारी २२जुलै रोजी देणार आहे.

लॉकडाऊनमुळे शिक्षक शिक्षकेतर घराबाहेर पडू शकत नाही. पण घरात राहून आंदोलनात सहभागी होणारं आहेत. घरातील कार्डपेपर अथवा कार्डबोर्ड अथवा साधा पांढरा पेपर घेवून या पेपरवर आपला विरोध दर्शवणारी खालील वाक्ये लिहिणार आहेत. पेपर समोर धरून फोटो काढून व हा फोटो शिक्षक भारती फेसबुक पेजवर, स्वतः च्या फेसबुक पेज वर आणि व्हॉटसअपवर शेअर करणार असल्याची माहिती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

कार्ड पेपर वरील ओळी

शिक्षणमंत्री जाग्या व्हा

अधिसूचना रद्द करा

माझी पेन्शन, माझा अधिकार

प्रचलितनुसार अनुदान द्या

शिक्षक भारती

१० जुलै २०२० रोजीच्या अधिसूचनेवर प्रत्येक कर्मचाऱ्याचा लेखी आक्षेप कुरिअरने अथवा पोस्टाने मंत्रालयापर्यंत पोहचणार आहे. १० ऑगस्टपूर्वी मंत्रालयात लाखो पत्रांचा ढीग पडणार आहे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱयांच्या हक्कावर घाला घालणारे  निर्णय घेणाऱ्या शिक्षण विभागातील  अधिकाऱ्यांना घरी बसवण्यासाठी आणि  अधिसूचना रद्द होऊन प्रचलित पद्धतीनुसार अनुदान वितरीत होईपर्यंत आणि जुनी पेन्शन योजना लागू पर्यंत आमचा लढा सुरू ठेवायचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची केंद्रीय संसदीय कार्यकारी समितीची उद्या मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उद्या २७ मार्च रोजी सकाळी ११ वा, केंद्रीय संसदीय कार्यकारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *