Breaking News

शरद पवार लवकरचं भेटणार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहना सीमा सुरक्षा दलाला दिलेल्या अधिकारामुळे देशाच्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का

पिंपरी-चिंचवड: प्रतिनिधी

राज्य आणि केंद्र अधिकाराच्या अनुषंगाने राज्यघटनेने निर्धारीत केलेल्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का देणारा निर्णय केंद्र सरकारने पुन्हा एकदा घेत आंतरराष्ट्रीय सीमावर्ती असलेल्या भागातील राज्यांच्या ५० किलोमीटर परिसरात तपासणी करण्याचे राज्यांच्या पोलिसांइतकेच अधिकार केंद्रीय सीमा सुरक्षा दलास दिला. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्राने राज्यांच्या अधिकार अतिक्रमण केल्याप्रकरणी आपण लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज दिली.

पिंपरी-चिंचवड येथील एका कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यापूर्वी आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागातील राज्यांमध्ये १५ किलोमीटर अंतरापर्यत तपासणी आणि कारवाई करण्याचे अधिकार सीमा सुरक्षा दलास होते. आता या अंतरात वाढ करत ती ५० किलोमीटर इतपर्यत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंजाबमधील अमृतसर येथील गोल्डन टेंम्पल हे भारत-पाकिस्तान सीमेपासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच पुढील वर्षी पंजाब विधानसभेच्या निवडणूका होत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयालयाने हा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम राज्य केंद्र संबधावर होणार आहे. त्याचबरोबर राज्य घटनेतील मुळ फेडरल स्ट्रक्चरला धक्का बसणार आहे.

सीमा सुरक्षा दलाच्या हद्दीत वाढ करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना केंद्र सरकारने या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागातील दहशतवाद्यांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध आणि त्यांच्यावर कारवाई करणे शक्य होईल असे सांगत यामुळे झीरो टॉलरंस वातावरण निर्माण होईल असे स्पष्ट केले.

पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसने केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करत राज्य आणि केंद्र संबधाविषयीच्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का लावण्याचे काम केंद्र करत असल्याचा आरोप केला.

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाने या नव्याने जारी केलेल्या आदेशासंदर्भात केंद्र सरकारच्या उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गुजरातमधील अदानी मुद्रा बंदरावर सापडलेल्या कोट्यावधींच्या ड्रग्ज वरून जनतेचे लक्ष्य हटविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपा केला.

दरम्यान या प्रश्नावरून पंजाब काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून काही दिवसांपूर्वी पंजाबचे नवे मुख्यमंत्री चन्नी यांनी अमित शाह यांची भेट घेवून पाकिस्तानच्या सीमा सील करण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने निर्णय घेतल्याने चन्नी यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *