Breaking News

पवारांनी सांगितला किस्सा, “…गडकरींची कृपा” इतर राज्यात गेल्यानंतर अधिकारी, राजकारणी सांगतात

अहमदनगर : प्रतिनिधी

बऱ्याच दिवसांनी शरद पवार आणि भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे एकाच मंचावर आल्यानंतर हे दोन्ही नेते काय बोलतात याविषयी सबंध राज्याचे लक्ष लागून राहिलेले होते. त्यानुसार शरद पवार यांनी नितीन गडकरी काय बोलतात याविषयीचा किस्सा सांगताना म्हणाले की, देशाच्या कोणत्याही राज्यात गेल्यानंतर त्या ठिकाणचे उत्तम रस्ते बघायला मिळतात. तिथले खासदार, मंत्री, अधिकाऱ्यांकडे हा विषय काढला की ते म्हणतात ‘ही गडकरी साहेबांची कृपा आहे‘ असा किस्सा सांगत लोकप्रतिनिधी सत्तेचा अधिकार हातात आल्यानंतर त्याचा उपयोग देशाच्या उभारणीसाठी कसा करू शकतो, याचं उत्तम उदाहरण गडकरींनी दाखवलं असल्याचे कौतुकोद्गार शरद पवार यांनी गडकरी यांच्याविषयी काढले.

अहमदनगर येथील महामार्ग प्रकल्पाच्या कामाच्या उद्घाटनप्रसंगी हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

रस्त्याची वाहतूक समाजाच्या व्यापक हितासाठी महत्त्वाची असते, यात गडकरींचा मोलाचा वाटा आहे. गडकरींनी ही जबाबदारी (रस्ते वाहतूक मंत्रालय) घेण्याच्या पूर्वी देशात ५ हजार किमीचं काम झालं होतं. गडकरींकडे जबाबदारी आल्यानंतर तोच आकडा १२ हजार किमीच्या पुढे गेला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, आपल्याला रस्त्याने प्रवास करायला आवडत देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला कामानिमित्त जावं लागतं. गाडीनं प्रवास करण्यात मला स्वत:ला आनंद मिळतो. कारण त्यामुळे रस्ते बघायला मिळतात, आजूबाजूच्या शेतातलं पीक बघायला मिळतं. म्हणून मी शक्यतो रस्त्यांनी प्रवास करण्याचा प्रयत्न करतो.

दरम्यान, नितीन गडकरी आपल्याकडे येणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पक्ष न बघता विकासकाम बघतात. संसदेत मी बघतो की गडकरींकडे येणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा पक्ष ते बघत नाहीत तर त्यानं आणलेलं विकासकाम काय आहे हे ते पाहतात. त्याचा परिणाम देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात होतो अशी असे ही ते म्हणाले.

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *