Breaking News

“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली असताना दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मला वैयक्तिक फोन करून माझी सुरक्षा काढून घ्या असे सांगितले. तसेच यासंदर्भात मला पत्रही लिहिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली.

भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय कोणत्याही सुडबुध्दीने अथवा राजकिय पध्दतीने घेतला नाही. राज्यातील नेत्यांच्या थ्रेट पर्सेस्पशन संदर्भात उच्च पदस्थ पोलिस अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यात अनेकांच्या सुरक्षेत कपात करावी अशी सूचना या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला केली. त्यानुसार भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

परंतु स्वत:ची सुरक्षा काढून घ्यावी यासाठी आमचे नेते शरद पवार यांनी मला फोन करून सांगितले तसेच पत्र लिहिल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *