Breaking News

शरद पवारांनी सांगितले, होय मला राजचा फोन आला…. राज्यपालांच्या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी केला पवारांना फोन

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील वीज ग्राहकांना येत असलेल्या वाढीव वीज बिलाच्यासंदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नुकतीच भेट घेतली. परंतु त्यांनी शरद पवारांशी बोलण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आज फोन केल्याची माहिती दस्तुरखुद्द पवार यांनीच दिली. मात्र भेटीबाबत अद्याप कोणतेही ठरले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वाढीव वीज बीलाच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी शिष्टमंडळासह राज्यपालांची भेट घेतली. परंतु राज्यपाल कोश्यारी यांनी याप्रश्नी कोणतेही ठोस आश्वासन देण्याऐवजी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला. त्यामुळे राज ठाकरे यांना पवार किंवा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्याशिवाय पर्याय राहीला नाही. परंतु त्यांनी राजकिय शिरस्त्यानुसार सर्वात आधी शरद पवार यांना फोन करून यासंदर्भात चर्चा केल्याची पवारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

तसेच भेटीसंदर्भात अद्याप कोणताही निर्मय झाला नसून सध्या मी बाहेर गावी जात असल्याने परत आल्यानंतर पुढील भेटीबाबत बघू असे त्यांनी सांगितले.

 

Check Also

भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *