Breaking News

शरद पवारांचीच नियत खोटी राजकारणासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा प्रयत्न राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई : प्रतिनिधी

शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घ्यावीअसा सल्ला देणाऱ्या शरद पवारांचीच नियत खोटी आहे. दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा क्रिकेटवर डोळा ठेऊन आयपीएलमध्ये गुंतलेले शरद पवार सत्ता गेल्यावर वैफल्यातून शेतकऱ्यांना भडकावण्याचा घृणास्पद प्रकार करत असल्याची  खरमरीत टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली.

शेतकऱ्यांच्या संपाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या सल्ल्याचा पाशा पटेल यांनी कडक शब्दात समाचार घेतला. सध्याच्या सरकारची नियत कशी आहेयाचे मोजमाप करण्यापूर्वी शरद पवार यांनी आपण इतकी वर्षे शेतकऱ्यांच्या नावाने मते मिळवून सत्ता भोगली तरी शेतकऱ्यांची अवस्था अशी का झालीयाचे आधी उत्तर द्यावेअसे आव्हान त्यांनी दिले.

 अभ्यासक पी. साईनाथ यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात भाजपाचे सरकार सत्तेवर येण्यापूर्वी २०१३ या एकाच वर्षात किमान ३ हजार १४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.  २००४ ते २०१३ या कालावधीत राज्यात दरवर्षी सरासरी ३ हजार ६८५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या म्हणजे दहा वर्षे दररोज दहा शेतकरी आत्महत्या करत होते. शरद पवार देशाचे कृषीमंत्री झाल्यावर राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती २००४ नंतर अधिक वाईट झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

 शरद पवार जवळजवळ पन्नास वर्षे सत्तेत होते. ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. दहा वर्षे देशाचे कृषीमंत्री होते. पंधरा वर्षे त्यांच्या पक्षाचे राज्यात आघाडी सरकार होते. या काळात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी प्रभावी उपाय झाले नाहीत म्हणून शेतकरी रस्त्यावर आला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांच्या मतांच्या आधारावर सत्ता गाजवायची आणि जमिनी बळकावायच्या एवढाच उद्योग शरद पवार व त्यांच्या साथीदारांनी केला. त्यामुळेच जनतेने त्यांना पंचायत ते पार्लमेंट सर्वत्र पराभूत केले. जनतेमधील पाठिंबा संपुष्टात आला आणि विश्वासार्हता उरली नसल्याने आता शरद पवार शेतकऱ्यांना भडकावून पुन्हा राजकीय महत्त्व वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांना टोकाची भूमिका घ्यायला सांगून त्यांचा आंदोलनात बळी द्यायचा व तापलेल्या वातावरणात स्वतःचे राजकारण साधायचेहा शरद पवार यांचा डाव घातक असल्याची टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांची नियत साफ आहे. सध्याचे शेतकऱ्यांचे प्रश्न हे आधीच्या सरकारचे पाप असले तरी केंद्र आणि राज्य सरकारने ते सोडविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले आहेत. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलेली आतापर्यंतची सर्वाधिक मदत आणि राज्य सरकारने लाखो शेतकऱ्यांसाठी पारदर्शीपणे राबवलेली कर्जमाफी योजना ही दोन ठळक उदाहरणे आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी चांगल्या मनाने केलेल्या कामांची यादी देता येईलपण सत्ता गेल्यामुळे बेभान झालेल्या शरद पवारांना सरकारची नियत साफ दिसणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या राजकीय डावाला बळी पडू नये असे आवाहनही त्यांनी शेतकऱ्यांना केले. 

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *