Breaking News

शरद पवार : पडळकरांची टीका भाजपा नेते सावध तर राष्ट्रवादीचे प्रतित्तुर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मात्र शांत

पंढरपूर-मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील सर्व बहुजनांच्या चळवळी मारून टाकणारे शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याची टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे केली. त्याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत पडकरांच्या या वक्तव्याप्रकरणी भाजपाने सावध पवित्रा घेत पक्षाचा संबध नसल्याचे स्पष्टीकरण दिल्याने ते एकटे पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या युवक आघाडीसह गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडकरांना इशारा देत मानसिक उपचार करून घेण्याचा सल्ला दिला.
पंढरपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांच्यावर टीका केली.
त्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यासंदर्भात बोलताना म्हणाले की, कोणत्याही नेत्याच्या विरोधात अशा प्रकारची टीका करता येत नाही. भले ही ते पंतप्रधान मोदी असतील किंवा शरद पवार असतील. त्यामुळे पडळकरांनी अशा पध्दतीची टीका करायला नको होती अशी भूमिका मांडली.
गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्याप्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी त्या वक्तव्याशी भाजपाचा संबध नसल्याचे जाहीर करत ते वक्तव्य त्यांचे खाजगी वक्तव्य असल्याचे जाहीर केले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर हे मोठ्या उंचीचे नेते असल्याची उपरोधिक टीका करत मोठ्या नेत्यांचा तोल जातो. मात्र पडळकरांनी अशा पध्दतीचे पुन्हा वक्तव्य केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे नेत्यांनी तर बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्याने त्या दु:खातून अजून सावरले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झालेला दिसत असून त्यांनी स्वत:वर मानसिक उपचार करून घ्यावेत त्याचा सर्व खर्च राष्ट्रवादी काँग्रेस करेल अशी टीका त्यांनी केली.
यासर्व पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर असलेले देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Check Also

केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उभे पीक आणि आयुष्य उध्वस्त करणाऱ्या रानडुकरासारखे शिवसेना प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा गड़करींना टोला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आघाडी सरकारला बैलाची उपमा देवून स्वतःची कातडी वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *