Breaking News

आणि तेल लावलेल्या पैलवानाने अब की बार २२० पारचा वारू अडविला शरद पवारांच्या झंझावातामुळे मरगळलेल्या काँग्रेसला ४३ हून अधिक जागा तर राष्ट्रवादीला ५० हून अधिक

मुंबईः विशेष प्रतिनिधी
काही वर्षापूर्वी शरद पवार हे तेल लावलेले पैलवान असून ते कशातच सापडत नसल्याचे प्रशस्तीपत्रक शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी दिले होते. तर त्याच अनुषंगाने विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी समोर विरोधक रूपी पैलवान दिसल्याचे वक्तव्य करत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात कुठेच दिसत नसल्याचे दाखवून दिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपला झंझावती दौरा आणि प्रचाराचा असा काही धुराळा उडवून दिला की अबकी बार २२० पार चा नारा देणाऱ्या भाजपा-शिवसेनेचा चांगल्यापैकी धुव्वा उडविल्याचे विधानसभा निकालावरून स्पष्ट झाले.
विधानसभा निवडणूकीची घोषणा आधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेची घोषणा करून राज्यभरात दौऱे सुरु केले. त्या यात्रेस काही ठिकाणी चांगला प्रतिसाद तर काही ठिकाणी तुरळक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे भाजपाने अब की बार २२० के पार अशी घोषणा केली.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक मातब्बर पवारांची साथ सोडून भाजपाच्या आश्रयाला जात होते. त्याचबरोबर काँग्रेसमधील अनेकजणही भाजपाच्या आश्रयाला जात होते. त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये भाजपाशिवाय कोणताच पर्याय नसल्याचे चित्र निर्माण झाले.
परंतु, याच कालावधीत शरद पवार यांना ईडीने आपल्या आरोप पत्रात नाव समाविष्ट केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे अखेर निवडणूकीच्या रिंगणात शरद पवारांना उतरण्याशिवाय पर्याय राहीला नाही. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर पवार यांनीही अशाच तीन महिने राज्यव्यापी दौरा करत महाराष्ट्रात ५३ जागा निवडूण आणल्या होत्या. मात्र आता पक्षाबरोबर ४० वर्षाचे राजकिय जीवन त्यांनी पणाला लावत राज्यव्यापी दौरा केला.
या दौऱ्यात त्यांनी पुन्हा एकदा नव्या तरूण पिढीला साद घालत सोबत घेतले. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री पदी ४४ वर्षाच्या फडणवीस यांच्यापेक्षा पवारांचे मोठ्या जल्लोषात तरूणांकडून स्वागत केले जात होते. तसेच त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही मिळत होता.
याउलट राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्याच मतदारसंघातील प्रचाराशिवाय इतर कोणत्याही भागात प्रचारासाठी जाताना दिसत नव्हते. त्याचबरोबर राज्यात काँग्रेसला चेहरा असा नव्हता. अपवाद फक्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या तीन सभांचा अपवाद वगळला तर इतर नेत्यांनी फक्त मुंबईत प्रचारकी थाटात पत्रकार परिषदा घेण्याव्यक्तीरिक्त काही केले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूकीचा माहोल असूनही काँग्रेस कुठेच दिसत नसल्याचे चित्र दिसत होते.
विधानसभा निवडणूकीचे निकाल जसजसे लागयला सुरुवात झाली. तसतसे १८० ठिकाणी आघाडीवर असलेली भाजपा दुपारनंतर १६० च्या आत आली. तर राज्यातील १३०-४० ची डरकाळी फोडणाऱ्या भाजपाला १०१-१०२ जागांवर आणून ठेवले. तर १०० पार करण्याची मनिषा बाळगून असलेल्या शिवसेनेला पुन्हा ६० च्या आत आणून ठेवले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात भाजपा फॅक्टर नव्हे तर पवार फॅक्टरच असल्याचे शरद पवारांनी दाखवून दिले. त्यामुळे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत पवार हे तेल लावलेले पैलवान असल्याचे सिध्द झाले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *