मुंबईः विशेष प्रतिनिधी
केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात राज्यातल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. परंतु राज्यपाल गोव्याला गेले असून त्यांना कंगणाला भेटायला वेळ आहे. मात्र माझ्या शेतकऱ्याला भेटायला वेळ नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी करत शेतकऱ्यांना भेटायला वेळ नसल्याचा टोला लगावला.
संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल मिळेल असे वाटलं नव्हतं. मात्र महाराष्ट्राला असा राज्यपाल मिळाला. राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे. पण त्यांना शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही असा खोचक टोलाही त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला.
सभेनंतर शेतकरी कामगार मोर्चा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जाणार होते. त्यासाठी ४ ची वेळ राज्यपालांनी मोर्चेकऱ्यांना दिली होती. परंतु राज्यपाल गोव्याला मिळाल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे पवारांनी सांगितले.
