Breaking News

शरद पवार ब्रीच कँडी रूग्णालयात अॅडमिट परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबत डॉक्टर निर्णय घेतील- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पोटात आज पुन्हा दुखायला लागल्याने आज त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र आज पुन्हा पोटात दुखायला लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
शरद पवारांना उद्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात येणार होते. मात्र आजच पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढच्या तपासण्या व औषधोपचार इथेच होणार असून परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील अशी माहितीही त्यांनी दिली.

काल शरद पवार यांना रूग्णालयात तपासणीसाठी नेल्याचे वृत्त कळताच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक नेत्यांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांना बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच आतापर्यंत इतर आजारावर मात करून पुन्हा सक्रिय राजाकरणात परतलात तसे पुन्हा एकदा सक्रिय व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या आजारावरही शरद पवार मात करतील असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कायर्कर्त्यांनी शरद पवार यांना आराम पडावा यासाठी मंदीर, मस्जिद आणि चर्चमध्ये प्रार्थना करण्यास सुरुवात केली.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *