Breaking News

शरद पवारांनी खोटं बोलू नये भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी वगळता काँग्रेस आणि एमआयएमशी आघाडी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून भारिपवर टीका केली. त्याचा खरपूस समाचार घेत १९९७-९८ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या बरोबर झालेल्या समझोत्यानुसार निवडणूक लढविली. त्यावेळी झालेल्या समझोत्यात शरद पवार हे कुठेही नसताना त्यांनी ध़डधडीत खोटे बोलू नये असे प्रतित्तुर भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

१९९७-९८ साली काँग्रेसबरोबर निवडणूकीसाठी समझोता झाला होता. त्यावेळी मी अकोल्यातून निवडणूक लढविली. मात्र त्या झालेल्या समझोत्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कुठे ही नव्हते. त्यानंतर स्व. मुरली देवरा यांनी निरोप दिला की पवार भेटायला येत आहेत. घरी आल्यानंतर त्यांनी या समझोत्यात घेण्याची मागणी केली. मात्र त्यात घेणे शक्य न झाल्याने त्यांनी अकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दिल्याचे सांगितले.

त्यामुळे पवारांच्या वक्तव्यात तथ्य नसल्याचे सांगत माझ राजकारण आणि त्यांच्या वाक्याचा कोणताही संबध नसल्याचे सांगत व्यक्तीगत बोलू नये असा इशाराही त्यांनी यावेळी शरद पवारांना दिला.

Check Also

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल, त्यांच्यात औरंगजेबाची वृती

लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रासह देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी विविध राजकिय पक्षांकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *