Breaking News

पूरग्रस्तांसाठी देहव्यापारातील भगिनीही देणार दोन दिवसाची कमाई सांगली-कोल्हापूर-सातारा भागात मदत वाटप, श्रम कार्यास नगर मधून चमू रवाना

अहमदनगरः प्रतिनिधी
राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली बरोबरच कर्नाटकातील बेळगावात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापूरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देहव्यापारातील भगिनींनीही पुढाकार घेतला आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या भगिनीकडून दोन दिवसांची कमाई मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती स्नेहालय परिवाराने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून देण्यात आली आहे.
तसेच पूरग्रस्तभागातील मदत कार्य चमूत बेळगाव येथील स्नेहालय कार्यकर्ते नरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर येथील उमेश पंडुरे,योगेश हिवाळे,राहुल संत सहभागी होणार आहेत. हा चमू श्रम कार्यासाठी नुकताच रवाना झाला असून नगर जिल्ह्यातुन स्नेहालय परिवारातून कपडे,धान्य, औषधे,पाणी,इंधन मदत म्हणून गोळा केली. हे सर्व मदतीचे सामान घेऊन गांधी मैदान येथून ही टीम वाहन घेऊन गेली आहे. या भागात आलेल्या महापूर व त्यातून उदभवलेल्या भीषण स्थितीला सामोरे जाण्यासाठी अनामप्रेम, युवा निर्माण प्रकल्पातील कार्यकर्ते या कामासाठी उस्फूर्त पणे गेले आहेत. या चमू मध्ये दिव्यांग कार्यकर्ते रामेश्वर फटांगडे व गुरुनाथ रसाळ आहेत. या पूरग्रस्त भागातील वेश्यावस्ती, अपंग शाळा, संस्था यांना साहित्य वाटप ही टीम करणार आहे. साथीचे रोग प्रतिबंधक औषधे मोठ्या प्रमाणावर या कार्यकर्त्यांनी सोबत घेतले आहेत. याची तीव्र गरज वाटप करताना समोर येत आहेत.
जीवनावश्यक वस्तू औषधे यांची नितांत गरज
आज सकाळी स्नेहालय चमू बेळगाव जिल्ह्यातील खेड्यात पोहचला. येथे सोबत नेलेली सामुग्री दुपारी पर्यंत १५०० लोकसंख्येला वाटप करण्यात आली आहे. या भागात सुमारे २ लाख पेक्षा जास्त लोकसंख्येला धान्य, औषधे, कपडे यांची गरज आहे. पाणी,पडझड,मगरी,दलदल यामुळे येथे मदत कार्य पोहचण्यात अडथळे येत आहेत. तरी देखील येथे श्रमकार्यास व जीवनावश्यक साहित्य यांची नितांत गरज असल्याचे या टीमने कळवले आहे. पुढील ४ दिवस नगर शहरातील, जिल्ह्यातील दात्यांनी अनामप्रेम, स्नेहालय भवन मागे,गांधी मैदान अहमदनगर येथे जीवनावश्यक वस्तू द्याव्यात. १८ ऑगस्ट ला पुन्हा एकदा वाहन या पूरग्रस्त भागात साहित्य घेऊन जाणार आहे. याबाबत मदतीचे आवाहन अनामप्रेम परिवाराने केले आहे.

Check Also

केंद्रीय निवडणूक आयोगाने पंतप्रधान मोदी यांना दिली आचारसंहितेतून सूट?

एखाद्या मतदारसंघातील किंवा राज्यातील विधिमंडळ अथवा संसदेच्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर झाल्यानंतर त्या त्या राज्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *