Breaking News

देशातील सर्वात मोठ्या आयपीओसाठी सेबीची मंजुरी पेटीएमची १६,६०० कोटी रुपये उभारण्याची योजना

मुंबई : प्रतिनिधी

डिजिटल पेमेंट आणि वित्तीय सेवा कंपनी पेटीएमला आयपीओसाठी शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची मंजुरी मिळाली आहे. आयपीओद्वारे १६,६०० कोटी रुपये उभारण्याची पेटीएमची योजना आहे. कंपनी नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत लिस्ट होऊ शकते.

पेटीएम भारतातील सर्वात मोठा आयपीओ घेऊन येत आहे. जर पेटीएमने १६,६०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण केले तर कोल इंडिया लिमिटेडने २०१३ मध्ये उभारलेल्या १५,००० कोटी रुपयांच्या पुढे जाईल. पेटीएमने इक्विटीद्वारे ८,३०० कोटी रुपये आणि ऑफर-फॉर-सेलद्वारे ८,३०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा आणि अलीबाबा ग्रुपच्या कंपन्या प्रस्तावित ऑफर-फॉर-सेलमधील त्यांचा काही हिस्सा कमी करतील.

पेटीएमच्या भागधारकांमध्ये अलिबाबाचा एंट समूह (२९.७१%), सॉफ्टबँक व्हिजन फंड (१९.६३%), SAIF भागीदार (१८.५६%) आणि विजय शेखर शर्मा (१४.६७%) यांचा समावेश आहे. एजीएच होल्डिंग, टी रो प्राइज, डिस्कव्हरी कॅपिटल आणि बर्कशायर हॅथवे यांचा कंपनीत १०% पेक्षा कमी हिस्सा आहे. हिस्सा विकणाऱ्यांमध्ये अँटफिन (नेदरलँड्स) होल्डिंग बीव्ही, अलीबाबा डॉट कॉम सिंगापूर ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड, एलिव्हेशन कॅपिटल व्ही एफआयआय होल्डिंग्स लि., एलिव्हेशन कॅपिटल व्ही लिमिटेड, एसएआयएफ III मॉरिशस कंपनी लिमिटेड, एसएआयएफ पार्टनर्स इंडिया, V लिमिटेड, SVF पँथर (केमन) लिमिटेड आणि BH इंटरनॅशनल होल्डिंग्ज यांचा समावेश आहे.

पेटीएम आयपीओचे मुख्य बुक-रनिंग मॅनेजर जेपी मॉर्गन चेस, मॉर्गन स्टेनली, आयसीआयसीआय सिक्युरिटीज, गोल्डमन सॅक्स, एक्सिस कॅपिटल, सिटी आणि एचडीएफसी बँक आहेत. पुढील आठवड्यात दोन कंपन्या आयपीओ आणणार आहेत.  नायका (Nykaa) ५,४०० कोटी रुपये आणि फिनो पेमेंट्स बँक ३०० कोटी रुपये आयपीओद्वारे उभारणार आहेत. ब्यूटी और वेलनेस सेवा देणाऱ्या Nykaa चा आयपीओ २८ ऑक्टोबर रोजी उघडून १ नोव्हेंबर रोजी बंद होईल. Nykaa ५,४०० कोटी रुपयांपैकी ६३० कोटी रुपये आयपीओमधून उभारेल. तर उर्वरित पैसे ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे उभारले जातील. Nykaa ४.३१ कोटी शेअर्स जारी करेल. फिनो पेमेंट्सचा आयपीओ २९ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून २ नोव्हेंबर रोजी बंद होईल. फिनो पेमेंट्सचा शेअर्स १२ नोव्हेंबर रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केला जाईल. सेबीने गेल्या आठवड्यातच हा आयपीओ मंजूर केला होता.यामध्ये टीपीजी, लाईट हाऊस इंडिया फंड, जेएम फायनान्शियल, योगेश एजन्सीज, सुनीलकांत मुंजाल, हरिंदर पाल सिंग, नरोत्तम सेक्सारिया आणि माला गांवकर त्यांचे शेअर्स विकतील.

Check Also

ओला कॅबचा आयपीओ लवकरच बाजारात ५०० लाखाचा निधी उभारण्यासाठी महिनाभरात आणणार

SoftBank अर्थसहाय्याने प्रणित ओला कॅब Ola Cabs पुढील तीन महिन्यांत $५०० दशलक्ष उभारण्यासाठी प्रारंभिक सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *