Breaking News

शालेय शिक्षण मंत्री गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांच्या वाहनाला अपघात

हिंगोली: प्रतिनिधी

दोन दिवसांपासून हिंगोली दौऱ्यावर असलेल्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघात कोणालाही ईजा झाली नाही. मंत्री गायकवाड या एक कार्यक्रम आटोपून दुसऱ्या एका ठिकाणाची पाहणी करण्यासाठी चालल्या असताना एका मिनी टेम्पोने त्यांच्या वाहनाला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे गाडीच्या मागील बाजूस किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या असल्या तरी त्यांना कोणतीही ईजा झालेली नाही.

वर्षा गायकवाड या हिंगोलीच्या पालकमंत्री मागील दोन दिवसापसून त्या हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी एक कार्यक्रम आटोपून रामलीला मैदानाची पाहणी करण्यास असताना वर्षा गायकवाड यांच्या कारला भरधाव टेम्पोनं मागच्या बाजून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती आहे.

वर्षा गायकवाड हिंगोलीतील ऑक्सिजन प्रकल्पाचं उद्घाटन करुन रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या भरधाव महिंद्रा पीकअपनं वर्षा गायकवाड यांच्या कारला मागच्या बाजून धडक दिली. यामध्ये कारचं मागच्या बाजूच नुकसान झाले आहे. मात्र, यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. हिंगोलीतील कामाचा आढावा घेण्यासाठी त्या कालपासून हिंगोली दौऱ्यावर आहेत. हिंगोलीतील नियोजित कार्यक्रमानुसार रामलीला मैदानापर्यंत जाण्यासाठी निघाल्या असताना हा अपघात झाला.

यासंदर्भात अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *