Breaking News

स्किझोफ्रेनिया : समज आणि गैरसमज आजाराचा समज मोठा पण उपचार सुलभ

 

२४ मे हा दिवस जगभर जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने स्किझोफ्रेनिया किंवा मराठी रूढ अर्थाने वेडसरपणा आणि आजार असणाऱ्या व्यक्तींना वेडा असे संबोधला जातो म्हणजे रस्त्यावर जी अर्धवट, मळक्या कपड्यात घर सोडून भटकताना दिसतात. ती देखील ह्या आजाराने ग्रस्त असतात. परंतु कोमाला वेडा म्हणून हिणवण्याने त्या व्यक्तीला असणारा त्रास-आजार बरा होत नाही. उलट पक्षी अशा व्यक्तींना आणि आजाराला जाणून घेतल्यास अशा आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना आपण इतर व्यक्तींसारख सामान्य आयुष्य जगण्यास मदत करू शकू.

स्किझोफ्रेनिया आजाराची प्रमुख लक्षणे

त्यात सकारात्मक आणि नकारात्मक लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात.

सकारात्मक लक्षणे: व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टींवर गरजेपेक्षा जास्त चिडचिड करायला लागतो. झोप कमी होते. संशय घेणे, कोणीदारी मुद्दाम आपल्याला त्रास देत आहे. आपल्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे असा संशय यायला लागतो. मग तो एखाद्या ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीबद्दल किंवा व्यक्ती समुहाबद्दल संशय निर्माण होणे, भास होणे, आसपास कोणीही नसताना कोणीतरी येवून गेला किंवा कानात कसली तरी कुजबूज किंवा कोणाचे तरी आवाज आल्यासारखे वाटतात, व्यक्तीच्या वागण्यात आणि बोलण्यात बदल होतो, आधी सर्वांशी व्यवस्थित वागणारी व्यक्ती नंतर विचित्र वागायला लागते हिंसक होणे, कधी व्यक्ती हिंसक होणे, माराममारी किंवा शिवीगाळ करते.

नकारात्मक लक्षणे

सर्वांशी मिळून मिसळून वागणारी व्यक्ती अलिप्त एकाकी राहयला लागणे.

मग बऱ्याचदा स्वत:शी पुटपुटताना बोलताना दिसणे.

स्वत:ची काळजी घेणे बंद करते म्हणजे रोज अंघोळ करणे, कपडे बदलणे बंद करते.

नोकरी किंवा व्यवसाया जायला अचानक बंद करते.

स्किझोफ्रेनिया हा आजार किंवा त्याची लक्षणे जगभरात १०० व्यक्तीमागे १ व्यक्तीमध्ये दिसून येतो.

त्याची कारणे: वेगवेगळी असू शकतात. परंतु मेंदूतील रसायनात झालेला बदल त्याचबरोबर अनुवंशिकता, मानसिक ताण-तणाव, ह्या सर्वांचा एकत्रित परिणाम ह्या आजारास कारणीभूत ठरू शकतो.

स्किझोफ्रेनिया आजारावरील उपाय

नियमित औषधोपचार : ह्या आजाराची लक्षणे जेवढ्या लवकर लक्षात येतील आणि जेवढ्या लवकर त्याचे उपचार होतील. तेवढा लवकर रूग्ण पूर्णत: बरा होतो. रूग्ण कधी बरा होत नाही. हा फक्त गैरसमज किंवा रूग्णाला फक्त झोपेची औषधे दिली जातात तर ते देखील चुकीचे आहे. रूग्णांना आवश्यक असणारी औषधे दिली जातात. त्यात बऱ्याचवेळा रूग्ण झोपून राहतो. औषधे नियमित होईपर्यंतहा तसा औषधाचाच इफेक्ट किंवा दुष्परिणाम म्हणून औषधांचे खुप सारे साईड इफेक्ट किंवा दुष्पपरिणाम जाणवतात म्हणून डॉक्टरांच्या नियमित सल्ल्याने औषधे घेतल्यास रूग्ण पहिल्यासारखा अर्थात इतर व्यक्तींसारखा नॉर्मल राहतो. स्किझोफ्रेनियाच्या उपचारात गोळ्या औषधे नाही तर त्याबरोबर समुपदेशन आणि विद्युत उपचार (शॉक थेरपी) चा समावेश होतो.

आधुनिक औषधोपचार विद्युत उपचार ही सगळ्यात सुरक्षित आणि प्रभावी आहे. विद्युत उपचार हे ज्यांना आत्महत्येचे प्रबळ विचार येतात, जी हिंसक असतात, ज्यांना गोळ्याचा जास्त परिणाम दिसून येत नाही त्यांना दिले जातात.

डॉ. हर्षल थडसरे, मानसोपचार तज्ञ (एमबीबीएस, एमडी)

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *