Breaking News

मागासवर्गीयांच्या वसतिगृहात मध्यवर्ती किचन, सीसीटीव्ही बसविणार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यात मुंबई, पुणेसह अनेक जिल्ह्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरीता राज्य सरकारकडून वसतीगृहे सुरु करण्यात आली. मात्र यातील अनेक वसतीगृहातील मुली व मुलांना चांगले जेवण मिळावे यासाठी मध्यवर्ती स्वयंपाक घर सुरु करणार असून वसतीगृहातील सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्हीही बसविणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

विधानसभेत राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहे, आश्रमशाळा, तेथील भोजन व्यवस्थेचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान उपस्थित करण्यात आला. त्यास उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

राज्यातील इतर जिल्ह्यातील वसतिगृहांच्या तुलनेत मुंबई, पुणे येथील वसतिगृहे बरे या परिस्थितीत आहेत. मात्र इतर ठिकाणच्या वसतीगृहाची अवस्था फारच कठीण आहे. यातील अनेक इमारतींची नव्याने बांधणी, पुर्नबांधणी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या सर्व इमारतींच्या सुधारणेचा विचार सरकार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच सर्वच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगले भोजन मिळावे यासाठी त्या त्या जिल्ह्यातील पुरवठादार, ठेकेदारांना संधी देवून मध्यवर्ती स्वंयपाक घर सुरू करण्यात येणार आहे. तसेच या जेवणांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असून या सर्वांचे अत्याधुनिकीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय या वसतिगृहातील विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. सध्या काही वसतिगृहात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. मात्र आता ते सर्वच वसतीगृहात बसविणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *