Breaking News

एसबीआयची फेस्टिव्हल ऑफर; पर्सनल, कार, गोल्ड लोनचे व्याजदर घटवले नवरात्रीसाठी खास ऑफर

मुंबई : प्रतिनिधी

स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) या नवरात्रीसाठी खास ऑफर आणली आहे. यामध्ये एसबीआय पर्सनल लोन, कार आणि सोने तारण  कर्ज कमी व्याज दरात देत आहे. याशिवाय बँकेने कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

एसबीआय सध्या ७.२५ टक्के व्याज दराने कार कर्ज देत आहे. ग्राहकांना कारच्या ऑन रोड किमतीच्या ९० टक्केपर्यंत कर्ज मिळणार आहे. तर एसबीआयच्या सोने तारण कर्जाचा व्याजदर ७.५० टक्के आहे. दुसरीकडे, पर्सनल लोनचा व्याज दर ९.६० टक्केपासून सुरू होत आहे. या  कर्जावर तुम्हाला कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

एसबीआयने सणांच्या पार्श्वभूमीवर गृहकर्ज ग्राहकांसाठी उत्सव ऑफर सुरू केल्या आहेत.  एसबीआयने गृहकर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. आता ७५ लाख रुपयांपर्यंतच्या गृह कर्जावरील व्याजदर समान राहील. बँकेने केवळ ६.७० टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर दिली आहे. कर्जाची रक्कम कितीही असली तरी आता कर्जदारांना किमान ६.७० टक्के दराने गृहकर्ज घेता येईल. याशिवाय, गृहकर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्कही भरावे लागणार नाही.

दरम्यान, एसबीआयचे ग्राहक आता विनामूल्य आयकर रिटर्न (आयटीआर) दाखल करू शकणार आहेत. एसबीआय ग्राहक YONO अॅपवर Tax2Win द्वारे ITR दाखल करू शकतात. एसबीआयने सोशल मीडियाद्वारे सांगितले की आपण टॅक्स २ विनद्वारे योनोवर हे विनामूल्य करू शकता. ही ऑफर ३१ ऑक्टोबरपर्यंत वैध आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत आयटीआर भरावा लागेल. या तारखेनंतर परतावा दाखल केल्यास ५ हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. जर करदात्याचे उत्पन्न ५ लाख रुपयांपर्यंत असेल तर उशिरा दंड म्हणून १ हजार रुपये भरावे लागतील.

याआधी बँक ऑफ बडोदाने आपलं गृहकर्ज स्वस्त केलं आहे. बँकेने गृहकर्जाच्या व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली आहे. आता बँकेच्या गृहकर्जाचा व्याज दर ६.५० टक्केपासून सुरू होईल. नवीन कर्जाव्यतिरिक्त नवीन व्याजदराचा लाभ इतर बँकांकडून हस्तांतरित केलेल्या गृहकर्जावरही उपलब्ध होईल. नवीन दर ७ ऑक्टोबर २०२१ पासून लागू झाले आहेत आणि ३१ डिसेंबर पर्यंत लाभ उपलब्ध होईल.

ग्राहकांना गृहकर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही. बँकेने गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्क आधीच माफ केले आहे. बँकेने ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, जर तुम्ही आता कर्ज घेतले तर तुम्हाला दुहेरी लाभ मिळेल.

Check Also

एक्सने फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इतकी खाती केली बंद नवी माहिती आली पुढे

इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील एक्स X कॉर्पने एका महिन्याच्या कालावधीत तब्बल २१२,६२७ खात्यांवर बंदी घालून, बाल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *