Breaking News

संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे प्रति आव्हान ईडीला भाजपा नेत्यांची नावे द्याच

मुंबईः प्रतिनिधी
शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या १२० नेत्यांच्या नावाची यादी आपण देणार असल्याचे जाहीर करत भाजपाला आव्हान दिले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आव्हानाची तात्काळ दखल घेत राऊतांनी जाहीर केल्याप्रमाणे नावे द्यावीच असे प्रतिआव्हान देत शिवसेनेवर पलटवार केला.
ते पुणे येथील पदवीधर मतदारसंघात आयोजित प्रचारसभेत बोलत होते.
प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी ईडीने छापे मारत त्यांचा मुलगा विहंग याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यामुळे ही कारवाई जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आरोप महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी केला. तसेच विरोधकांना संपविण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
भाजपाच्या या पडद्यामागच्या राजकारणाला आव्हान देण्याच्या उद्देशाने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा खा. संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळ्यातील भाजपाच्या १२० नेत्यांची यादी आपल्याकडे असून ती यादी लवकरच ईडीला देवू असे सांगत बघुया ईडी कारवाई करते का? असा सवाल उपस्थित केला.
त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांनी ती नावाची यादी द्यावीच असे प्रतिआव्हान देत आम्हीही यादी देवू असे सांगत पलटवार केला.

Check Also

भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *