Breaking News

मंत्री राठोड आले, आता कारभारही संभाळतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी १५ दिवसानंतर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी बैठकीत कोणताही प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही. राठोड आता विभागाच्या दैंनदिन कामकाजाला सुरुवात करतील असे नवाब मलिक यांनी सांगितले.
मंत्री राठोड यांच्यावरू सध्या विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारवेर धरले असताना महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांनी मात्र त्यांची पाठराखण केली. त्यातच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राठोड हे थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा या शासकिय निवासस्थानी रवाना झाले. त्यामुळे विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यापुढे राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मलिक यांनी त्यांच्या उपस्थिती आणि पुन्हा कामकाजाला सुरुवात करण्याबाबत वक्तव्य केल्याने त्याचे वक्तव्य सूचक तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली.

न परवडणाऱ्या नागरिकांना केंद्राने मोफत कोरोना लस द्यावी-मलिक
महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी राज्यातील आरोग्य विभागाकडून कोरोना चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कॉन्ट्क्ट ट्रेसिंगही वाढविण्यावर भर देण्यात आली आहे. मात्र आता ज्या नागरीकांना कोरोनाची लस परवडणारी नाही, त्यांना केंद्र सरकारने मोफत लस द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून जर शुल्क आकारून कोरोना लस देण्यात येणार असेल तर त्याची सुरुवात लगेच करावी अशी मागणी करत यासंदर्भात ११ मार्चपर्यंत राज्यात अशी मोहिम राबविण्यास केंद्राकडून सुरुवात करावी. तसेच या योजनेची अंमलबजावणीही राज्य सरकारकडून करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
तून मलिक यांचे सूचक वक्तव्य तर नाही ना? अशी चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *