Breaking News

मानवी हक्क आयोगाच्या आदेशानंतर कफ परेड झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी समिती वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील कफ परेड येथील डॉ.आंबेडकर नगरातील अनधिकृत झोपडपट्टी धारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी प्रधान सचिव (गृहनिर्माण) यांचे अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

डॉ. आंबेडकर नगर  येथील अनधिकृत झोपड्या कांदळवन कक्ष व वन विभागामार्फत निष्कासित करण्यात आल्या होत्या. सदर कारवाई विरोधात घर बचाओ घर बनावो आंदोलन या सामाजिक संस्थेमार्फत महाराष्ट राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार नोंदवण्यात आली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने मानवी हक्क आयोगाने या अतिक्रमण  झोपडपट्टीधारक यांच्यासाठी ठोस पुनर्वसन प्रकल्प तयार करण्यासाठी विशेष समिती नेमण्याची सूचना केली होती.या अनुषंगाने  गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव  यांचे अध्यक्षतेखाली  समिती नेमण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. तर अपर मुख्य सचिव वने,उपसंचालक म्हाडा, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक (कांदळवन कक्ष) व जिल्हाधिकारी मुंबई उपनगर हे सदस्य म्हणून काम करणार आहेत.

सदर समिती झोपडपट्टी धारक यांच्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची कागदपत्रे तपासणे, पात्रता ठरवणे व पुनर्वसनासाठी शिफारसी करणे याबाबत कार्यवाही करणार आहे अशी माहितीही त्यांंनी दिली.

Check Also

मुख्यमंत्र्यांची ग्वाही, खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीतेला न्याय देणार गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा

मुंबई : प्रतिनिधी साकिनाका परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *