मुंबई : प्रतिनिधी
भारतातून नेलेल्या गीरगाईचा गोवंश वाढवून ब्राझीलने धवलक्रांती घडवून आणली. ब्राझीलमध्ये ही जात आजही सर्वोच्च उत्पादन देणारी जात बनली आहे. याच धर्तीवर राज्यात १२ लीटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधन करून क्रांतिकारी वाटचाल करण्याचा मानस असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.
दुग्ध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. यासाठी शेळी संवर्धनाकडे भर देण्यात येत आहे. कॅनडामध्ये सानेन नावाच्या शेळीची एक नवीन विकसित जात आहे. ही शेळी दिवसाला १२ लिटर दूध देते. अशी शेळी जर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिली तर आपल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलून जाईल. याकरीता राज्यात काही भागात लवकरच हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
