Breaking News

समृध्दी महामार्गाच्या भूमिपूजनाची डेडलाईन चुकणार? डिसेंबर महिना संपत आला तरी भूमिपूजनाचा मुहूर्तावर निर्णय नाही

मुंबई : प्रतिनिधी

नागपूरला मुंबईशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाचे भूमिपूजन नियोजित वेळापत्रकानुसार डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात येत होणार होते. मात्र या प्रकल्पासाठी १०० टक्के जमिन खरेदी झालेली नसल्याने या समृध्दीच्या भूमिपूजनाची डेडलाईन चुकण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.

समृध्दी महामार्गाची योजना जाहीर केल्यानंतर साधारणत: एक ते दिड वर्षात प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १०० टक्के जमिन खरेदी करायची आणि डिसेंबर २०१७ मध्ये त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्याचे नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यासाठी केंद्र आणि राज्यातील बँकांना वित्तीय सहाय्य करण्याबाबत सातत्याने गळ घालण्यात आली. मात्र बँकांकडून न ना चा पाढा कायम राहील्याने अखेर राज्याच्या तिजोरीतून या प्रकल्पासाठी निधी उभा करण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानुसार म्हाडा, एमआयडीसी, सिडको, एमएमआरडीएने दिलेल्या फंडातून जमिनींची खरेदी करण्यात आली. मात्र या प्रकल्पासाठी शहापूर, इगतपुरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. त्यामुळे जमिन खरेदीत मोठ्या प्रमाणावर एकूण प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीपैकी आतापर्यंत फक्त ४८ टक्के जमिनच खरेदी करता येणे एमएसआरडीसीला शक्य झाले आहे. तरीही राज्य सरकारची डेडलाईन चुकू नये यासाठी एमएसआरडीसीने डिसेंबर महिन्यात समृध्दीचे भूमिपूजन करण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी हा प्रस्ताव आल्याचे मान्य केले. मात्र अधिक बोलण्यास नकार दिला. तर भूमिपूजनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवून देण्यात आला आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

Check Also

भाजपाचे शरद पवार यांना प्रत्युत्तर,… संविधान बदलाच्या अफवा

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *