Breaking News

मलिकांच्या गौप्यस्फोटानंतर वानखेडेंची पत्नी रेडकर म्हणाल्या, धमक्यांचे फोन येतायत समीर वानखेडे देशसेवा करत असल्याचा केला दावा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राचा मुद्दा उपस्थित करत समीर वानखेडे अडचणीत आले. यापार्श्वभूमीवर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे आरोप फेटाळून लावत आपल्याला, व मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा खळबळजनक आरोप केला.

राज्य सरकारकडून आम्हाला संरक्षण मिळाले आहे. त्यानंतरही आमच्यासोबत धमक्यांचे सत्र सुरुच आहे, समीर वानखेडे सत्याच्या मार्गाने देशाची सेवा करत आहेत. ते अनेकांना खटकते, असा बचाव क्रांती करत आपले पती समीर वानखेडे यांच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचा दावा त्यांनी केला.

समीर वानखेडे यांच्यावरील आरोप चुकीचे आहेत. समीर सत्याच्या मार्गाने जात आहेत. ते अनेकांना खटकतं. पुरावे असतील तर या लोकांनी न्यायालयात जावे. समाज माध्यमांवर आरोप करुन काय होणार. या प्रकरणातून समीर बाहेर पडतील. नेहमी सत्याचा विजय होतो. मला काहीही काळजी वाटत नाही. समीर हे निर्दोष आहेत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
नवाब मलिक यांना वेळच उत्तर देईल, आम्हाला समाज माध्यमांवर निशाणा बनवले जात आहे. आपत्तीजनक भाषेत वक्तवे केली जात आहेत. या सगळ्याचा मानसिक त्रास होत आहे. पण, मराठी असल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी समीर यांची बहिण व मनसे पदाधिकारी जास्मिन वानखेडे याही यावेळी उपस्थित होत्या. नवाब मलिक यांच्याकडे खरोखरच पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे. समाज माध्यमांवर आरोप करुन लोकांचा वेळ वाया घालवू नये, असा सल्ला जास्मिन यांनी मलिक यांना दिला.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांचा अल्टीमेटम, महाविकास आघा़डीला २६ मार्च पर्यंतची मुदत

आगामी लोकसभा निवडणूकीत काहीही करून भाजपाला केंद्रातील सत्तेत जाण्यापासून रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *