Breaking News

संभाजी ब्रिगेड म्हणते आम्हाला ओबीसीत समाविष्ट करा महासचिव सौरभ खेडेकरांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे मराठा समाजाने नैराश्यात न जाता गायकवाड आयोगाच्या अहवालाचा आधार घेत महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करू आणि ओबीसी समाजात समाविष्ट करण्याची मागणी लावून धरू असा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिला.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड गेली अनेक वर्ष मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश ही मागणी लावून धरलेली आहे. मागील काही काळामध्ये घटनेच्या १५/४ व १६/४ कलमा अंतर्गत मराठा समाजाला शिक्षण व नोकरी यामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या सवलतीचा लाभ घेत राहणे व मराठा समाजाचा ओबीसी समावेशासाठी लढत राहणे या प्रकारची भूमिका संभाजी ब्रिगेड ने घेतलेली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर घटना पिठाची मागणी करण्यात आली होती. त्यावेळीही संभाजी ब्रिगेडने हा धोका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. आरक्षण लढ्यात सहभागी झालेल्या समाज बांधव व संघटनांना यानिमित्ताने पुनश्च एकदा विनंती करण्यात येत आहे की, आपण नैराश्यात न जाता गायकवाड आयोगाचा अहवालाचा आधार घेत महाराष्ट्र सरकारवर दबाव निर्माण करून ओबीसी समावेशासाठी आग्रह धरणे हे योग्य राहणार असल्याचे ते म्हणाले.

Check Also

मेट्रो कारशेड जागाबदलासाठी नवीन समितीचा निव्वळ फार्स, अहवाल आधीच तयार! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी मेट्रो-3च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट आधीच घालण्यात आला असून, त्यासाठी आधीच अहवाल तयार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *