Breaking News

सचिन वाझेचे व्हायरल झालेले पत्र: काय लिहिलय माहित आहे का? फक्त दोन पाने व्हायरल, नाव आणि सहीचे पान गायब

मुंबई : प्रतिनिधी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाने भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी सध्या एनआयएच्या ताब्यात असलेल्या निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांने एनआयए न्यायालयाला एक खळबळजनक पत्र लिहिल्याचे बाब सध्या समाजमाध्यमावर चांगलेच व्हायरल झाले आहे. या पत्रातील पहिली दोन पाने व्हायरल झाली असून त्यापुढील पाने मात्र व्हायरल झालेली नाहीत. त्यामुळे ते पत्र नेमके सचिन वाझे यांनीच लिहिले आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

पण त्या त्या हस्ताक्षरातील पत्रात नेमके काय गोप्यस्फोट करण्यात आला हे जाणून घेवूया…मुळ पत्र इंग्रजीत असल्याने त्याचा हा स्वैर मराठी अनुवाद..

 

एनआयए केस नं. आरसीआय/२०२१/ मुंबई

आदरणीय न्यायाधीश

मला २००४ पासून निलंबित ठेवण्यात आले होते. मला दिनांक ६ जून २०२० ला रीतसर सेवेत पुन:स्थापित करण्यात आले.

मला सेवेत पुनःस्थापित केल्यानंतर माझी सेवेतील पुनःस्थापना मागे घेण्याबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. यामुळे मला परत निलंबितच ठेवण्यात यावे याबद्दल  शरद पवार यांनी आदेश दिले असल्याचे मला मा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोनद्वारे नागपूर येथून सांगितले.

त्यावेळी गृहमंत्री साहेबांनी मला हे ही सांगितले कि त्यासाठी आपण पवार साहेबांना समजावून (कन्व्हीन्स) सांगू तुम्हाला पुन्हा सेवेत घेवू त्यासाठी त्यांनी (गृहमंत्री साहेब) मला २ कोटी रूपये देण्यास सांगितले. त्यावर इतकी मोठी रक्कम देण्यास मी असमर्थता दर्शविली. त्यावर त्यांनी मला नंतर ती रक्कम देण्याबाबत विचारणा केली.

त्यानंतर माझी पोस्टींग झाली. त्यानंतर जुलै-ऑगस्ट २०२० मध्ये मंत्री अनिल परब यांनी त्यांच्या शासकिय बंगल्यावरून मला फोन केला. नेमक्या त्याच आठवड्यात डिसीपी यांच्या बदल्यांचे आदेश ३-४ दिवसात रिवाईज झाल्या होत्या. या भेटी दरम्यान, आदरणीय मंत्र्यांनी मला एसबीयुटीबाबतच्या विरोधात प्राथमिक चौकशीकडे पाहण्याबाबत विचारणा करत एसबीयुटीच्या ट्रस्टींना आपल्यापर्यंत घेवून येण्यास सांगत त्यांच्याबरोबर चर्चा करावयाची असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्राथमिकस्तरावर चौकशी बंद करण्यासाठी त्यांच्याकडे ५० कोटींची मागणी करण्यावरही भर दिला. परंतु मी हि गोष्ट करण्यास असमर्थ असल्याचे स्पष्ट करत मुळात एसबीयुटीच्या विरोधात सुरु असलेली चौकशी माझ्या अधिपत्याखाली नव्हती आणि त्या संस्थेतील कोणाला मी ओळखतही नसल्याचे त्यांना सांगितले.

त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये आदरणीय मंत्री परब साहेब यांनी मला पुन्हा त्यांच्या शासकिय निवासस्थानी बोलावले, त्यावेळी मुंबई महापालिकेकडून भ्रष्ट पध्दतीने कामे करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीतील कॉंन्ट्रॅक्टरांच्या कामाची एका निनावी तक्रारीच्या आधारे चौकशी सुरु असून ती सध्या प्राथमिक स्तरावर आहे. त्यामुळे या यादीतील किमान ५० कॉंन्ट्रॅक्टरांकडून दोन कोटी रूपयांची रक्कम गोळा करावी. तसेच हि चौकशी सीआययुकडून सुरु असून ती तुझ्या अर्थात माझ्या बदलीनंतर त्यात कोणताही पुरावा आढळणार नाही.

जानेवारी २०२१ मध्ये मला पुन्हा गृहमंत्र्यांनी पुन्हा त्यांच्या शासकिय निवासस्थानी बोलावून घेतले. त्यावेळी त्यांचे पी.ए.कुलकर्णी तेथे हजर होते. आदरणीय मंत्री यांनी सांगितले….. (सोबत खाली जोडलेले हेच ते व्हायरल पत्र)

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *