Breaking News

वाझेेंचे आरोप : अनिल परब म्हणाले, मी कोणत्याही चौकशीसाठी तयार निलंबित पोलिस अधिकारी वाझेच्या पत्रात अनिल देशमुख आणि अनिल परब यांचे नाव

मुंबई: प्रतिनिधी

१०० कोटी रूपयांची खंडणी वसूल करण्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच दिल्याचे उदाहरण ताजे असतानाच निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांचे एनआयए कोर्टात सादर केलेले पत्र व्हायरल झाले. या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर अनिल परब यांनीही ५० कोटी रूपयांची खंडणी वसुल करण्यास सांगण्यात आल्याचा वाझे यांनी आरोप केला. मात्र मी अशा पध्दतीचे काम किंवा पाप कधीही केले नाही. त्यामुळे माझी न्यायालयीन, एनआयए, सीबीआय इतकेच माझी नार्को टेस्ट केली तरी मी चौकशीला तयार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगत वाझेचे आरोप फेटाळत असल्याचे म्हणाले.

मागील काही दिवसांपासून दोन मंत्र्यांनंतर आता तिसरा मंत्र्यांची विकेट काढणार असल्याची चर्चा भाजपाकडून करण्यात येत होती. त्याचबरोबर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर आम्ही तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा मागणार नसल्याचे जाहिर वक्तव्य केले नुकतेच केले होते.

त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ५० कोटी रूपयांची वसुली करण्यास आपणाला सांगितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी एनआयए कोर्टाला दिलेल्या पत्रात केला. त्याचबरोबर एका अनामी तक्रारीवर एसबीयुटी या संस्थेकडून ५० कोटी रूपयांची खंडणी वसुली करण्यास सांगितल्याची बाब नमूद करण्यात आली. एनआयएच्या ताब्यात सध्या सचिन वाझे असून एनआयएकडून अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी कोणी ठेवली या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. तो आतमध्ये असल्याने हे पत्र त्यांने कोणत्या स्थितीत लिहिले कि त्यांच्याकडून लिंहून घेतले गेले हे पाहणे गरजेचे आहे. परंतु मागील काही दिवसांपासून भाजपावाले ज्या पध्दतीने बोलत होते. त्या अनुषंगाने हे पत्र बाहेर आले असून या पत्राच्या माध्यमातून व्यक्तीश मी अनिल परब आणि मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचे षढयंत्र भाजपाने आखल्याचा पलटवार त्यांनी केला.

या पत्राची शाहनिशा करणे गरजेचे असून यासंदर्भात आपण पुढील कायदेशीर बाबी पाहणार आहे. तसेच या पत्रातील आरोपांची एनआयएकडून करण्यात येत असलेल्या तपासाचा काही संबध नाही. त्यामुळे ते याची चौकशी करतील असे वाटत नसल्याचे सांगत मी कोणतेही पाप केलेले नाही. तसेच भाजपावाले राजीनामा मागतात म्हणून राजीनामा देणार नसून माझ्या मुलींची शपथ घेवून सांगतो कि अशा कोणत्याही प्रकारचे कृत्य केलेले नाही. त्यात जर मी दोषी असेन तर माझे पक्षप्रमुख मला फासावर चढवतील असेही त्यांनी सांगितले.

यासंदर्भात मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटणार असल्याचे सांगत मी कोणत्याही स्वरूपाच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचा पुर्नरूच्चार केला.

Check Also

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *