Breaking News

सचिन वाझेंना मिळाली १० दिवसांची कोठडी एनआयए न्यायालयाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी

ठाणे येथील मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे अंबानी यांच्या घराजवळ आढळून आलेल्या स्फोटक प्रकरणाला वेगळेच वळण लागलं. त्यामुळे याप्रकरणातील प्रमुख तपासकर्त्ये पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना मध्यरात्री एनआयएच्या पथकाने अटक करत एनआयएच्या न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायालयाने वाझे यांना कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने २५ मार्चपर्यंत कोठडी दिली.

मागील महिन्यात अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी आढळून आलेली एक स्कॉर्पिओ आढळून आली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यातच या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर येथे आढळून आला. त्यामुळे याप्रकरणातील गुढ वाढले असतानाच हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांनी थेट संचिन वाझे यांच्यावर आरोप करत तसा जबाब पोलिसांना दिला. त्यामुळे या प्रकरणात पाणी मुरत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे विधानसभेत याविषयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित करत तपास एनआयएकडे देण्याची मागणी केली. परंतु राज्य सरकारने हा तपास एनआयएकडे हस्तांतर करण्यास नकार देत याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सुपुर्द केला. परंतु भाजपाकडून राजकिय सुत्रे हलत अखेर हा तपास एनआयएला हा तपास पारीत करण्याचे आदेश मिळाले त्यानंतर एनआयएनेही हा तपास हाती घेत असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले. त्यानुसार एनआयएला तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन राज्य सरकारला द्यावे लागले.

दरम्यान, दोन्ही यंत्रणांकडून तपास सुरू असताना शनिवारी एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची चौकशी केली. १३ तास चाललेल्या चौकशीनंतर एनआयएच्या पथकाने शनिवारी रात्री उशीराने वाझे यांना अटक केली. अटक करण्यात आल्यानंतर वाझेंची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर एनआयए न्यायालयसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने वाझे यांची २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडीत रवानगी केली आहे.

वाझे यांना अटक होण्याची शक्यता वाटल्याने यापूर्वीच अर्थात काल गुरूवारी-शुक्रवारी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार देत हे प्रकरण गंभीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यानंतर एनआयएने त्यांचा जबाब नोंदविला.

Check Also

मुंबईतल्या मच्छीमार बांधवांसाठी जीआर बदला पण मदत करा भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी तौक्ते वादळाने नुकसान झालेल्या मच्छीमार बांधवांचा आक्रोश सरकारने समजून घेऊन सध्याच्या जीआर मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *