Breaking News

भाजपच्या गोयल यांच्या युनायटेड फॉस्फरसच्या उपाध्यक्षा व्हीजेटीआयच्या अध्यक्ष काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गौप्यस्फोट

मुंबईः प्रतिनिधी
युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या कार्यालयात बेकायदेशीरपणे भाजपचे अवैध प्रचारसाहित्य बनवण्याचा काळा धंदा काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पथकाच्या उपस्थितीत उघडकीस आणली. त्यानंतर भाजपच्या पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल यांच्या या कंपनीच्या उपाध्यक्षा सँड्रा आर. श्रॉफ यांची व्हीजेटीआयच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली. विशेष म्हणजे ही नियुक्ती भाजपचे सरकार आल्यानंतर करण्यात आल्याने या कंपनीचे आणि भाजपचे घनिष्ठ संबध असल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. भाजपचे आणि युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीचा संबंध किती घनिष्ठ आहेत याचे नवनवीन पुरावे समोर येत आहेत. यातून या दोघांचे आर्थिक लागेबांधे आहेत हे स्पष्ट असून याची चौकशी कऱण्याची आवश्यकता असल्याची मागणी त्यांनी केली.
याप्रकरणी भारतीय जनता पक्षातर्फे शिक्षणमंत्री विनोद तावडे व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या कंपनीशी भाजपच्या असलेल्या संबंधाबाबत कितीही हात झटकले तरी पियुष गोयल यांचे बंधू प्रदीप गोयल हे या कंपनीचे संचालक आहेत ही वस्तुस्थिती पियुष गोयल यांना नाकारता येणार नाही. तसेच खा. संजय काकडे या कंपनी व्यावसायिक भागीदार आहेत ही वस्तुस्थिती कशी नाकारणार? परंतु त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे आणि धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर काही महिन्यातच युनायटेड फॉस्फरस लि. कंपनीच्या उपाध्यक्षा श्रीमती सँड्रा आर. श्रॉफ यांची शासनाच्या वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्युट (VJTI) च्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. भाजप सरकारने श्रॉफ कुटुंबियांवर ही मेहेरबानी का केली होती ? हे आता उघडकीस आल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *