Breaking News

रूग्णालय अधिक्षकांनी हमी दिल्यानंतर डॉक्टर-अधिपरिचारिकांच्या विरोधातील आंदोलन मागे गरोदर महिलेला दाखल न करून घेता त्रास दिल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप

सांगोला: प्रतिनिधी

येथील ग्रामीण रूग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला रूग्णालयात दाखल करून घेता त्यांना ताटकळत ठेवून त्यांना मानसिक व शाररिक छळ केल्याच्या निषेधआर्थ  सामाजिक कार्यकर्त्ये बापूसाहेब ठोकळ यांच्यासह सामाजिक संघटनांनी निषेधार्थ १५ ऑगस्ट २०२० स्वातंत्र्यदिनीच धरणे आंदोलन करत उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्यामुळे अखेर ग्रामीण रूग्णालयाच्या अधिक्षकांनी रूग्णांवरील उपचारात हेळसांड केली जाणार नसल्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

वैशाली संतोष राऊत आणि अश्विनी राहुल गजधने या आपल्या प्रसुतीसाठी ४ ऑगस्ट २०२० आणि १० ऑगस्ट २०२० रोजी ग्रामिण रुग्णालय सांगोला येथे गेल्या. मात्र तेथील ड्युटीवर असलेल्या स्त्री रोग तज्ञ व अधिपरिचारीका यांनी त्रास दिला. तसेच त्यांना तात्काळ दाखल करून घेता ताटकळत ठेवले. त्यामुळे त्यांच्या विरोधात सामाजिक संघटनांच्यावतीने स्त्रीरोग तज्ञ, अधिपरिचारिका यांच्या वागणुकीची चौकशी करून त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल करावा आणि दोन्ही माताना शासनाने अथवा त्रास देणारे डॉक्टर  परिचारिका यांच्या वेतनातून आर्थिक मदत करुन न्याय द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळ यांनी केली. ग्रामीण रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना या दोन्ही गरोदर महिलांना खाजगी रूग्णालयात जावून स्वत:वर उपचार करून घ्यावे लागल्याची माहिती पुढे आली आहे.

मात्र या रूग्णालयात नियुक्तीस असलेल्या स्त्री रोग तज्ञ या २३ जुलै २०२० पासून अंबेजोगाई येथे होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तसेच या दोन्ही गरोदर मातांच्या प्रसुतीसाठी अनकॉल डॉक्टरांकडून चिठ्ठी या दोन्ही महिलांना देण्यात आल्या. त्यानुसार या महिलांनी पुढील गोष्टी करण्याऐवजी त्यांनी तहसीलदार कार्यालय गाठत रूग्णालयातील स्त्री रोग तज्ञ व अधिपरिचारीका यांच्या विरोधात तक्रार केली. त्यामुळे याप्रकरण जास्तच चिघळले.  अखेर ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टर पुजा साळे आरोग्य अधिक्षक यांनी ग्रामिण रुग्णालयातील आधिपरिचारीका व स्टाफ इथुन पुढे रुग्णांची हेळसांड करणार नाहीत व चांगल्या वागणुकीचे लेखी पत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

तसेच सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी संबधीत यंत्रणेला या प्रकरणात न्याय देण्याच्या सुचना करत भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. हे उपोषण आंदोलन यशस्वी करण्यासाठी सांगोला तालुक्यातील मराठा सेवा संघ, धनगर समाज महासंघ संभाजी ब्रिग्रेड ,अखिल भारतीय होलार समाज संघटना, कोळी महासंघ,  मुस्लिम मोर्चा, बोधवृक्ष प्रतिष्ठाण,मायाक्का प्रतिष्ठाण, रामोशी समाज सुधारक मंडळ ,स्वाभिमानी होलार समाज संघटना नाथपंथी डवरी समाज आदर्श नाभिक समाज संघटना महाराष्ट्र राज्य कलाकार संघटना मानुसकी प्रतिष्ठाण ,बहुजन क्रांती मोर्चा यांनी पाठिंबा दिला.

Check Also

कोरोना : बाधितांबरोबरच आता मृतकांची नोंदही सर्वाधिक ६८ हजार ६३१ नवे बाधित, ४५ हजार ६५४ बरे झाले तर ५०३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसून येत असून प्रादुर्भाव पसरण्याचे प्रमाणही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *