Breaking News

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासाठी १७ ऑगस्टला धरणे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्यावतीने करण्यात येणार आंदोलन

गडचिरोली: प्रतिनिधी

नोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात १७ ऑगस्ट २०२० रोज सोमवारला दुपारी २.३० वाजता घरच्या घरून धरणे आंदोलन करण्यात येणार असून गडचिरोलीसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयत संघटनेच्यावतीने केवळ तीन किंवा चार जण निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली.

महाराष्ट्रातील जवळपास ४० हजार मागासवर्गीय कर्मचारी ३ वर्षापासून पदोन्नतीसाठी वंचित आहेत. न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिलेले आहे. तत्कालीन फडणवीस सरकारने २९ डिसेंबर २०१७ पासून पदोन्नती स्थगिती दिलेली आहे. तेव्हापासून आजतागायत पदोन्नती व नोकरीतील आरक्षण हे विषय रखडले आहेत. यापूर्वीही ३ नोव्हेंबर २०१८ मध्ये लोकशाही की पेशवाई या नावाने संपूर्ण राज्यभर आंदोलन केले होते. मात्र सध्या महाविकास आघाडीकडून पदोन्नतीच्या निर्णयाबाबत निर्णय घेणे अपेक्षित असताना याही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व स्थापनेतील पदोन्नत्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. याच्या निषेधार्थ येत्या १७ ऑगस्ट २०२० ला घरच्या घरुन एका सेंचुरी पेपर वर मागासवर्गीय पदोन्नती मध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे असे लिहून स्वतःच्या हातात धरलेला फोटो काढून, व्हाट्सअॅप, फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर अपलोड करून धरणे आंदोलन यशस्वी करायचे आहे. अनुसूचित जाती जमातीचे पदोन्नतीचे आरक्षण हा त्यांचा संवैधानिक हक्क आहे. पण दुर्दैवाने राज्य शासन याविषयी गंभीर नसल्याने सदर आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व  गडचिरोली जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचारी ,शिक्षक ,न.प.कर्मचारी, वन विभाग कर्मचारी ,कास्ट्राईब शिलेदारांनी करत असल्याची माहिती संघटनेचे राजकुमार घोडेस्वार अध्यक्ष कास्ट्राईब महासंघ गडचिरोली, प्रभाकर सोनडवले राज्य उपाध्यक्ष कास्ट्राईब महासंघ महाराष्ट्र , गंगाधर मडावी राज्य उपाध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र, यांच्यासह अन्य पदाधिाकाऱ्यांची एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली.

Check Also

कोरोनामुळे विद्यार्थ्यांची फि सरकारने भरावी, एकच फि राज्यभरात लागू करा शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यावर छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

मुंबईः प्रतिनिधी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने २७ जुलै रोजी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *