Breaking News

विद्यार्थी दशेतील आठवणींना उजाळा देत मंत्री जयंत पाटील यांनी केला लोकल प्रवास जयंत पाटील यांनी लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर केला प्रवास...

मुंबई: प्रतिनिधी

पक्षाच्या कामासाठी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चक्क सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने आज सायंकाळी प्रवास करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडला आणि लोकलमध्येही शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले.

आज पक्षाच्या कामकाजाकरीता उल्हासनगरला जात असताना जयंत पाटील यांनी बर्‍याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकलने प्रवास केला. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील यांनी लोकलने प्रवास केला आहे तसेच मधल्याकाळातही अनेकवेळा त्यांनी लोकलने प्रवास केला आहे. आजच्या प्रवासातील सहकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान सर्व जुन्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.

Check Also

एनसीबीच्या एसआयटी पथकाने सुरु केली चौकशी…आर्यनसह सर्वांना समन्स आर्यन खान मात्र आजारी असल्याने चौकशीला आला नाही

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणावरून जवळपास एक महिन्यापासून रोज नवनवे खुलासे येत असल्याने आर्यन खान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *