Breaking News

रेशनिंग व्यवस्थेबद्दल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे मंत्री भुजबळांना पत्र; केल्या या मागण्या पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याबरोबरच एसएमएस सेवा पुन्हा सुरु करा

मुंबई : प्रतिनिधी

 

प्रति,

ना.श्री.छगन भुजबळ साहेब

अन्न व नागरी पुरवठा मंत्री

महाराष्ट्र शासन.

 

विषय: रेशनिंग व्यवस्थेतील धान्य, शिधावस्तुंची गळती, भ्रष्टाचार, कार्डधारकांची फसवणूक, नियमांविषयी, अधिकारांविषयी लोकांमध्ये असणारे अज्ञान, संदिग्धता यांसारख्या त्रुटी दूर करण्यासाठी तसेच पारदर्शक व्यवस्थेसाठी खालील मागण्या करत आहोत.

 

मा.महोदय,

रेशन व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा २०१३ नुसार स्थानिक पातळीवर रेशन दक्षता समितीच्या सदस्यांना दुकानात येणारे धान्य किती आणि ते दुकानदाराकडे कधी आले याची माहिती SMS द्वारे मिळत होती. त्याचप्रमाणे दुकानात धान्य आल्यावर ते उतरवून घेताना स्थानिक प्रशासक आणि रेशन दक्षता समिती यांच्या देखरेखी खालीच धान्य दुकानात उतरवले जात असे. सध्या या दोन्ही प्रणाली बंद आहेत. त्याचप्रमाणे राज्यभरातील रेशन दक्षता समितीचे ही पुनर्गठन करण्यात आलेले नाही.

या दोन्ही प्रणाली सुधारित आणि नव्या माध्यमात पुन्हा सुरु व्हाव्यात अशी आमची मागणी आहे.

१. PDS मधल्या भ्रष्ट्राचाराला आळा घालू शकणाऱ्या पारदर्शकता वाढवणाऱ्या SMS प्रणाली पुन्हा सुरु कराव्यात. सर्व कार्डधारकांना त्यांच्या फोनवर त्यांच्या दुकानात धान्य आल्याची माहिती SMS द्वारे पाठवली जावी.

२. राज्यभरातील रेशन दक्षता समित्यांचे पुनर्गठण करून त्यात गावातील /प्रभागातील नियमित लाभार्थ्यांना समाविष्ट करून त्यांचे बळकटीकरण करावे.

अशा मागण्या आम्ही करत आहोत. तक्रार मुक्त आणि पारदर्शक रेशन व्यवस्थेचे ध्येय यातून साध्य होऊ शकेल असा मला विश्वास आहे.

धन्यवाद

आपली आभारी,

चित्रा किशोर वाघ

waghkchitra@gmail.com

 

Check Also

राऊत म्हणाले फडणवीसांना “कुंडल्या घेऊन बसलोय”, हि धमकीच होती ना शिवसेनेचा पलटवार

मुंबई: प्रतिनिधी वर्षपूर्तीनिमित्त दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना धमकी दिल्याचा आरोप आज विरोधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *