Breaking News

युतीच्या चर्चेचा पत्ता नसताना भाजपासाठी मित्रपक्षांकडून राज्यपालांना गळ केंद्रीय राज्यमंत्री आठवले, खोत, जानकर, पाटील यांनी घेतली राज्यपालाची भेट

मुंबईः प्रतिनिधी
राज्यात महायुतीला जनादेश मिळालेला असतानाही भाजपा-शिवसेनेकडून राजकिय कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेचे गाडे अडले असतानाच भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या रिपाई, रासप, रयत संघटना आणि शिवसंग्राम पक्षाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेसाठी भाजपालाच बोलवा अशी गळ घातल्याची माहिती मित्रपक्षांनी केल्याचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्यासाठी रिपाईच्यावतीने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, रासपचे महादेव जानकर, रयत शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत आणि शिवसंग्राम संघटनेचे संदीप पाटील यांचे शिष्टमंडळ आज सकाळी भेटीस गेले होते.
यावेळी राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ही मित्रपक्षांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना निवेदन देऊन केली.
राज्यात सरकार लवकर स्थापन झाले पाहिजे. मात्र अद्याप माझ्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंह कोश्यारी यांनी सांगितल्याचेही राज्यमंत्री आठवले यांनी सांगितले.
सरकार स्थापन करण्याबाबत चांगला तोडगा रामदास आठवलेंनी आपल्या कवितेतून द्यावा; ते चांगले कवी सुद्धा आहेत असे यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
येत्या दि.10 नोव्हेंबर पर्यंत राज्यात सरकार स्थापन होणे आवश्यक आहे. तसे झाले नाहीतर राष्ट्रपती राजवट नियमानुसार लागू होऊ शकते यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कोणतीही धमकी नसल्याचे मत ना रामदास आठवले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. शिवसेने ने उपमुख्यमंत्री पद आणि 16 मंत्रीपदे घेऊन भाजपाशी तडजोड करून सरकार मध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यपालांना भेटल्यानंतर केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वात मित्रपक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांनी सरकार स्थापन करण्याबाबत सूचना केली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचे भाकित, ४ जूनला एकमेकांच्या झिंज्या उपटतील, कपडे फाडतील…

गरीबीची कुचेष्टा आणि गरीबांची फसवणूक करणाऱ्या काँग्रेसने जनतेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *