Breaking News

केंद्रीय मंत्री आठवलेंनी मिसळला फडणवीसांच्या सूरात सूर प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी; २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी !

मुंबई: प्रतिनिधी

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत कोणी कितीही स्ट्रॅटेजी ठरवू द्या २०२४ ला नरेंद्र मोदीच येणार असल्याचे भाकित केले. त्यात आता केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही आपला सूर मिसळत

प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी ;

२०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी !

नरेंद्र मोदी आहेत आंबेडकरवादी; मग का प्रधानमंत्री बनणार नाहीत नरेंद्र मोदी? असा सवाल करत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखविला.

प्रशांत किशोर हे २०१४ च्या निवडणूकीत नरेंद्र मोदींसोबत होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत प्रशांत किशोर मोदींसोबत नव्हते. तरीही २०१९ च्या निवडणुकीत ३०३ जागा मिळवित मोठा विजय मोदींच्या नेतृत्वात भाजपला मिळाला. ज्या राज्यात प्रशांत किशोर यांनी प्रचार केला नाही. त्या राज्यांत ही भाजपला विजय मिळालेला आहे. त्यामुळे माझे म्हणणे आहे प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी कारण २०२४ मध्ये प्रधानमंत्री बनणार आहेत नरेंद्र मोदी असे ते म्हणाले.

आज मुंबईत संविधान निवासस्थानी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाले असल्याचे रिपाइं द्वारे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले.

विरोधी पक्षांमध्ये एकजूट नाही. त्यांच्यात एकमत नाही. एनडीए सोबत नसणारे विरोधी पक्षातील अनेक पक्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदींसोबत आहेत. त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केला तरी येत्या २०२४ च्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप एनडीए प्रचंड बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Check Also

…अन्यथा भाजपच्यावतीने तीव्र आंदोलन करणार विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *