Breaking News

सामाजिक न्यायमंत्री बडोले आणि त्यांच्या पत्नी बनल्या गीतकार डॉ.आंबेडकरांच्या विचारावर लिहीलेल्या गाण्यांवरील युगंधर गीत अल्बमचे अनावरण

मुंबई : प्रतिनिधी

सक्रिय राजकारणात राहुनही आपला छंद आणि आवड जपणारे राजकारणी फारच बोटावर मोजण्या इतके असतात. राजकारणात असूनही आपल्या कवितांमुळे वेगळा ठसा उमटविणारे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव आदराने घेतले जाते. अगदी त्याच वाटेने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शारदा बडोले हे जात असून या दोघांनी लिहीलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरील गाणी लिहीली आहेत.

या गाण्याच्या अल्बमचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत माटुंगा येथील षण्मुखानंद हॉलमध्ये २६ सप्टेंबर २०१८ रोजी संध्याकाळी होणार आहे. बडोले पती-पत्नींनी लिहिलेल्या गीतांना प्रसिध्द पार्श्वगायक हरिहरन, शंकर महादेवन, आदर्श शिंदे, बेला शेंडे यांनी आवाज दिला आहे. तर संगीत भूपेश गवई यांनी दिले.

 

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *