Breaking News

प्रबोधनकारांच्या वाक्याचा संदर्भ देत राज ठाकरेंचे ते ट्विट नेमके कोणासाठी राज ठाकरेंच्या दृष्टीने बांडगुळ नेमके कोण?

मुंबई: प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीय द्वेष निर्माण झाल्याचा जाहिर आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजना प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य वाचण्याचा सल्ला दिला. त्यानंतर राज यांनी पवारांना प्रतित्तुर देत त्यांच्या वाक्यातील शब्दांचा अर्थ समजावून सांगावे असे आव्हान दिल्याला २४ तास उलटून जात नाहीत. तोच राज  ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या माझी जीवनगाथेतील एक वाक्य ट्विट केले. मात्र ते वाक्य राजकारणातील त्यांचे ज्यांच्याशी जवळचे संबध आहेत त्यांच्यापैकी नेमके कोणासाठी लागू होते असा प्रश्न राजकिय वर्तुळात चर्चिला जात आहे.

राज ठाकरे यांनी प्रबोधनकारांच्या जीवनगाथा या पुस्तकातील “जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही…जिथे बौध्दीक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज विकासावर मोठमोठी ‌व्याख्याने देणे, म्हणजे बांडगुळानेच झाडाचं रक्त शोषणं होय !” हे एकच वाक्य ट्विट केले.

यातील संदर्भ हे त्याकाळीही तेव्हाच्या राजकिय परिस्थितीत लागू पडत होते आणि आताही त्याचा संदर्भ राष्ट्रीयस्तरावरील दोन नेत्यांना लागू पडत असल्याचे मत राजकारणातील एका ज्येष्ठ नेत्याने खाजगीत बोलताना व्यक्त केले.

वास्तविक पाहता राज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही घनिष्ठ संबध आहेत. दुसऱ्याबाजूला राज्यातील ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशीही त्यांचे जवळचे संबध आहेत. या दोन्ही नेत्यांची कार्यशैली वेगवेगळी आहे. मात्र या दोन्ही नेत्यांपैकी एका नेत्याला उद्देशूनच हे ट्विट केल्याने हे वाक्य कोणासाठी हे सांगणे अवघड असले तरी त्या वाक्यातून दोन अर्थ निघत आहेत. तसेच ते दोन वेगवेगळ्या राजकिय पक्षांच्या नेत्यांना चपलखपणे लागू पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

जरी ते वाक्य प्रबोधनकारांचे असले तरी ते राज यांनी ट्विट केले आहे. २०१४ च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या काळात राज ठाकरे हे उघड उघड भाजपा नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करत होते. त्यानंतर २०१९ च्या निवडणूकीच्या काळात त्यांनी नेमकी उलट भूमिका घेत पंतप्रधान मोदी आणि भाजपाच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर आजतायगत मोदी यांच्या राज्य कारभाराबाबत राज ठाकरे यांची भूमिका बदलेली नाही. तरीही भाजपाने राज्यातील महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक युतीसाठी हात राज ठाकरे यांच्यासमोर पुढे केला असल्याचे मत त्यांनी सांगितले.

तर मागील काळात राज ठाकरे यांचे शरद पवारांशी जवळचे संबध निर्माण झाले आहेत. तसेच ते सातत्याने त्यांच्या संपर्कात असून त्यांच्यात एकमेकांना उद्देशुन संकेताचे राजकारण सुरु आहे. मागील काही दिवसांमध्ये त्यांच्यात राजकिय वाद निर्माण झाली होती. मात्र त्यांनी मोठ्या शिताफीने दोघांनीही राजकिय वाद टाळल्याचे दिसून येत असताना राज ठाकरे यांचे ते ट्विट नेमके कोणाला उद्देशून आहे हे सांगणे आता अवघड असले तरी आगामी काळात त्याचे उत्तर लवकरच मिळेल असेही ते म्हणाले.

Check Also

भाजपा मनसेच्या नेतृत्वाखाली निवडणूका लढविणार ? चंद्रकांत पाटील यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोविडमुळे आणि राज्यातील सत्तांतरावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा चांगलीच बदनाम झालेली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *