Breaking News

local train: लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे प्रशासनाने अहवाल मागविला प्रत्येक स्टेशनवर लोहमार्ग पोलिसांचा कडक बंदोबस्त

मुंबई: प्रतिनिधी
मागील अनेक दिवसांपासून मुंबई महानगर प्रदेशात लोकल सेवा पुन्हा एकदा पूर्वरत सुरु करावी अशी मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात येत होती. त्यानुसार अखेर रेल्वे विभागाने लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासंदर्भातील प्रत्येक स्टेशनवरील लोहमार्ग पोलिसांकडून अहवाल मागविण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांमधील विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे लोकलने प्रवास करण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी परवानगी दिली तरच लोकलने प्रवास करता येणार आहे.
मुंबई महानगरातील कानाकोपऱ्यात सरकारी सेवेतील कर्मचारी, आरोग्य विभागाशी संबधित असलेले कर्मचारी आदीं राहतात. मात्र लोकल रेल्वे सुरू नसल्याने या सर्वांना वेळेवर आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे लोकल सेवा सुरू करण्याची मागणी राज्य सरकारकडून केंद्राला करण्यात येत होती. त्यानुसार अखेर रेल्वेने सोमवारी १५ जून पासून रेल्वे सुरू करण्याची तयारी दर्शविली असून यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वे राज्य सरकारकडे मागितली. त्यानुसार राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे अर्थात अत्यावश्यक सेवेतील कोणाला रेल्वेने प्रवास करता येणार, त्यासाठी कशा पध्दतीने परवानगी द्यायची, त्या परवानगीची खातरजमा कशी करायची आदी गोष्टींची विचारणा राज्य सरकारकडे केल्याचे त्यांनी सांगितले.
याच अनुषंगाने प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एन्ट्री आणि एक्झीटचे पॉईंट किती असतील तेथे पोलिसांकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ओळख कशी करणार आदीबाबतचा अहवाल लोहमार्ग पोलिंसाकडे रेल्वे प्रशासनाने मागितला असून तो अहवाल आज रात्रीत ई-मेलवरून रेल्वे प्रशासनास पाठविण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी एसएमएसद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही.

Check Also

ऐन निवडणूकीच्या धामधुमित सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

महाराष्ट्रासह देशभरात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारातील काँग्रेस आणि भाजपामधील आरोपा प्रत्यारोपामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *