Breaking News

या वर्गातील प्रवाशांना मिळणार रेल्वे तिकिटात सवलत सवलतींची नवी यादी रेल्वेविभागाकडून जाहिर

मुंबईः विशेष प्रतिनिधी
देशभरात विविध कारणासाठी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरीक असलेल्यांना रेल्वेने प्रवास करावा लागतो. मात्र प्रवास करणाऱ्या दिव्यांग, वरिष्ठ नागरीक, रूग्ण आदींना यापूर्वी रेल्वे तिकिटात सवलत मिळत होती. मात्र आता इंटरव्हिव्युसाठी जाणाऱ्या बेरोजगारांनाही तिकिट किंमतीत सवलत देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला असून त्याविषयीची यादीही जाहिर करण्यात आली.
तिकिट सवलत मिळणाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे…
वर्गवारी
-दिव्यांग
१)अपंग, लकवा भरलेल्या व्यक्ती प्रवास आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला तिकिट दरात रेल्वे तिकिटावर सवलत मिळणार आहे.
२) गंदीमंद, वेडसर व्यक्ती आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांना ही सवलत.
३) पूर्णतः अंध व्यक्ती आणि त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीस.
या वरील तीन वर्गात असणाऱ्या व्यक्तींना द्वितीय श्रेणी, प्रथम श्रेणी एसी, स्लिपर, थ्री टायर एसी मध्ये ७५ टक्के, १ क्लास एसी आणि टु टायर एसीमध्ये ५० टक्के तर राजधानी-शताब्दी एक्सप्रेसमधील थ्री टायर एसी, एसी चेअर कार मधील तिकिटावर २५ टक्के सवलत मिळणार. एमएसटी आणि क्युएसटी मध्ये ५० टक्के तिकिट दरात सवलत मिळणार असून ही सवलत सदर व्यक्तींसोबत असणाऱ्यांनाही मिळणार आहे.
४) ज्यांना बोलता-ऐकू येत नसलेल्या व्यक्तीला आणि त्याच्या सोबतच्या व्यक्तीला द्वितीय श्रेणी, स्लिपर कोच आणि प्रथम श्रेणी, एमएसटी आणि क्युएसटी मध्ये ५० टक्के तिकिट दरात सवलत मिळणार.
-रूग्ण
१) कर्करोगाने पिडीत रूग्ण व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीला द्वितीय श्रेणी, प्रथम श्रेणी आणि एसी चेअरमधील तिकिटावर ७५ टक्के सवलत, १०० टक्के सवलत स्लिपर आणि थ्री टायर एसी, फर्स्टक्लास आणि सेकंड क्लास एसी मधील प्रवासासाठी ५० टक्के सवलत मिळणार आहे.
२) थलेस्मियाच्या,हृदयविकार, किडनी पेशंट, होमोफिलीया, टीबी, क्षयरोग, एड्स, ओस्टोमी, सिकल सेल अमेनिया,एप्लॉस्टीक अमेनियाच्या रूग्णांना आणि त्याच्यासोबतच्या व्यक्तीला ७५ आणि ५० टक्के तिकिट दरात सवलत.
३) ज्येष्ठ नागरीकांमधील ६० वर्षे पुर्ण झालेल्या पुरूषाला तर ५८ वर्षे पूर्ण झालेल्या स्त्रीयांना तिकिट दरात अनुक्रमे ४० टक्के आणि ५० टक्के सर्व श्रेणीतील प्रवासात सवलत मिळणार आहे.
पुरस्कार प्राप्त व्यक्ती-
राष्ट्रपती पोलिस पदक विजेते, भारतीय पोलिस दलाकडून पदक प्राप्त यांना ५० आणि ६० टक्के तिकिट दरात सवलत मिळणार आहे.
श्रम पुरस्कार प्राप्त व्यक्तीला ७५ टक्के तिकिट सवलत सेकंड आणि स्लिपर श्रेणीतील प्रवासासाठी मिळणार.
नॅशनल ब्रेव्हरी अवार्ड प्राप्त मुलं व त्याच्या पालकांना, शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रपती पदक विजेत्यांना ५० टक्के सेकंड आणि स्लिपर कोचमधील तिकिटावर सवलत मिळणार आहे.
शहीदांच्या (पोलिस, लष्कर, कारगील, आयपीकेएफ) विधवा पत्नींना ७५ टक्के तिकिट सवलत सेकंड आणि स्लिपर सेलमध्ये मिळणार आहे.
विद्यार्थी
गावापासून शिक्षण घेण्यासाठी दुसऱ्या गावी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के प्रवाशी तिकिटावर सवलत मिळणार असून अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना ७५ टक्के तिकिटावर सवलत मिळणार आहे. तर १२ वी पर्यंतच्या मुलींना मोफत रेल्वे प्रवास करता येणार आहे.
याशिवाय इतर वर्गातील प्रवाशांना सवलत मिळणार आहे. ती खालीलप्रमाणे…

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *