Breaking News

रेल्वेत समाविष्ट करण्यासाठी प्रशिक्षणार्थींचा रेल रोको आंदोलक विद्यार्थ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये एकजण जखमी

मुंबई : प्रतिनिधी

गेल्या अनेक महिन्यापासून रेल्वेच्या विविध विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत असूनही नोकरीत समाविष्ट केले जात नसल्याने आज सकाळी अचानक माटुंगा ते दादर दरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी रेल रोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे उपनगरातून सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांवर मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाल. तसेच पोलिसांनी आंदोलनकांना हटविण्यासाठी केलेल्या लाठीचार्ज मध्ये एक प्रशिक्षणार्थी विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.

मुंबईसह राज्यभरातील रेल्वेच्या विविध विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून जवळपास १० ते १५ हजार तरूण काम करत आहेत. या प्रशिक्षणार्थींना रेल्वेत कायमस्वरूपी म्हणून समाविष्ट करण्याची मागणी या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांकडून सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे करण्यात येत होती. मात्र त्यास कोणीच दाद देत नसल्याने ऑल इंडिया अँक्ट अँप्रेंटीस असोसिएशनच्यावतीने आज (मंगळवार) सकाळी ७ वाजता अचानक जवळपास ५०० ते एक हजार प्रशिक्षणार्थींनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल रोको आंदोलन सुरु केले. त्यामुळे रेल्वे प्रशासनासह पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.

दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे मार्गावरून बाजूला करण्यासाठी समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांनी आपल्याला ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे अखेर पोलिसांनी आंदोलकांना पांगिवण्यासाठी लाठीचार्ज सुरु केला. यात एक तरूण जखमी झाला.

या आंदोलनांमुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.

 

Check Also

कोरोनाचा जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प खालापूरला स्थलांतरीत करणार आराखडा सादर करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी गोवंडी येथील नागरिकांसह अनेक मुंबईकरांची गोवंडी येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबईबाहेर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *