Breaking News

भुजबळ म्हणाले, शिवरायांच्या काळातला रायगड किल्ला उभारा पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

मुंबई: प्रतिनिधी

रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरातपर्यटन मंत्री आदित्य ठाकरेप्रधान सचिव वल्सा नायरसिंहपर्यटन संचालक दिलीप गावडेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलीलपर्यटन सहसंचालक डॉधनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होतेअन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळपर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरेखासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.

रायगड किल्ल्याच्या पुर्नसंवर्धनासाठी राज्य सरकारने खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना केली असून या प्राधिकरणाच्या मार्फत जुने वैभव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून या प्राधिकरणाला ६०० कोटी रूपयांचा निधी देण्यात आल्याचेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.

 भुजबळ पुढे म्हणाले कीनाशिक हे देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहेइथे पर्यटक आल्यानंतर तो फक्त देवदर्शन करुन परत न जाता त्याने काही दिवस इथे रहावे यासाठी परिसरातील अनेक पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहेपरिसरातील शिर्डीत्र्यंबकेश्वरसप्तश्रुंगीगड आदी पर्यटनस्थळांची कनेक्टिव्हीटी वाढविण्यात आली आहेआज सुरु करण्यात आलेले ग्रेप पार्क रिसॉर्ट आणि बोट क्लबमुळे नाशिकच्या पर्यटनास मोठी चालना मिळेल अशी आशा आहे.

Check Also

भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…..तर महागात पडेल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भुजबळांना जाहिर धमकी

मुंबई: प्रतिनिधी छगन भुजबळ तुम्ही जामीनावर आहात…काय बोलायचं ते इथल्या गोष्टीवर बोला. नेत्यांवर बोलू नका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *