Breaking News

प्रियंका आणि राहुलच्या संवेदनशिलतेला भाजपकडून मोदींच्या व्हिडिओचे असेही उत्तर कोण सर्वाधिक संवेदनशील स्पर्धा सुरु?

मुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील दलित पीडीत मृत मुलीचे पार्थिव तिच्या कुटुंबियांच्या हाती न सोपविता पोलिसांनी त्यावर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर तिच्या कुटुंबियांना दोन दिवस डांबून ठेवत पोलिसांच्या एसआयटी टिम व्यतीरिक्त कोणालाही भेटू किंवा फोनवरून संपर्क करू दिला नाही. या पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी  काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे जात असतना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना दिलेल्या वागणूकीचे फोटो सोशल मिडियात व्हायरल होवून पोलिसांना टीकेचे धनी व्हावे लागले. अखेर योगी सरकारने त्यांना भेटण्याची परवानगी दिल्यानंतर राहुल-प्रियंकाचे पीडीत कुटुंबियांची त्यांच्या घरात इतर सर्वासामान्य व्यक्तीप्रमाणे भेट घेत त्यांना धीर देण्याचे फोटो व्हायरल झाले. तसेच त्यातून प्रतिबंबित होणाऱ्या संवेदनशीलतेची चर्चाही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या फोटोमुळे भाजपा गोटात भलतीच अस्वस्थता पसरली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही कसे संवेदनशील आहेत. याचा एक व्हिडिओ भाजपाने प्रसारीत केला असून तो व्हिडिओ केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी स्वत:च्या ट्विटरवरून रिलीज केला. पाहूया तो व्हिडिओ…

 

Check Also

मुख्यमंत्री म्हणाले की, लस घेतल्यानंतरही कोरोना होतो पंतप्रधानांनी बैठकीत सांगितल्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाला रोखण्याचा भाग म्हणून जरी लसीकरणाची मोहिम राबविण्यात येत असली तरी लस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *