Breaking News

विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून घोषणा

नागपूर: प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाल्याची घोषणा विधान परिषदेचे सभापती नाईक निंबाळकर यांनी आज केली.
सभागृह नेतेपदी देसाई व विरोधी पक्षनेते पदी दरेकर यांची निवड झाल्याबद्दल सभापती नाईक निंबाळकर यांनी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरेकर यांना विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावर नेऊन बसविले.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल दरेकर यांचे अभिनंदन करताना सभागृह नेते देसाई म्हणाले की, दरेकर यांनी सामाजिक, क्रीडा क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. मुंबईतील सहकार चळवळीत त्यांचे मोठे योगदान आहे. मुंबईचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची मदत होईल.
दरेकर अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना म्हणाले की, विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदाला मोठी परंपरा आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हे पद सांभाळले आहे. सभागृहाचे कामकाज शांततेत जास्तीत जास्त काळ चालावे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू. सभागृहात होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून कष्टकरी, कामगार व वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी वित्त व नियोजन मंत्री जयंत पाटील, विधानपरिषद सदस्य सर्वश्री भाई गिरकर, भाई जगताप, किरण पावसकर, ॲड. अनिल परब, जयंत पाटील, सुरेश धस, सुजितसिंह ठाकूर आदींनीही अभिनंदनपर भाषण केले.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *