Breaking News

शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या मुलाला ईडीने घेतले ताब्यात आघाडीतील सहयोगी पक्षांकडून भाजपावर टीकेचा सूर

मुंबईः प्रतिनिधी
आर्किटेक्चर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी सातत्याने आवाज उठविल्याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने आज सकाळी धाडी टाकत सरनाईक यांचे सुपुत्र विहंग यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
नाईक प्रकरणात सरनाईक यांनी सातत्याने आवाज उठविला. त्यामुळे या प्रकरणाची बंद झालेली फाईल राज्य सरकारने पुन्हा उघडली. तसेच पुढील तपास प्रक्रिया सुरु करून रिपब्लिक टि.व्ही.चे संपादक तथा वृत्त निवेदक अर्णब गोस्वामी यांना अटक करत तुरुंगातही रहावे लागले. त्यामुळे या कारवाईचे राजकिय उट्टे कधी तरी निघणार अशी अटकळ राजकिय वर्तुळात बांधली जात होती. मात्र या प्रकरणात थेट ईडीनेच कारवाई करण्यास सुरूवात झाल्याने ईडीच्या कारवाईचा अन्वय नाईक प्रकरणाशी संबध जोडला जात आहे.
ईडीने सकाळपासून सरनाईक यांच्या १० ठिकाणावर छापे मारून तपासणी केली. तसेच सरनाईक यांची सुपुत्र विहंग सरनाईक यांना दुपारनंतर चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान या कारवाईच्या विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली असून भाजपने उत्तर देण्याऐवजी विरोधकांच्या विरोधात सरकारी संस्थांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप केला.

Check Also

एकनाथ खडसे यांची अवस्था ना घर…, महाजनांच्या त्या वक्तव्यामुळे शिक्कामोर्तब ?

राज्यातील भाजपाचे जूने वरिष्ठ नेते तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार एकनाथ खडसे हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *