Breaking News

मोदी, नितीशकुमारांच्या विजयाचे शिल्पकार प्रशांत किशोर उध्दव ठाकरेंच्या भेटीला

नव्या राजकिय चर्चांना उधाण

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पार्टीचे सदस्य असलेल्या आणि जनता दल (संयुक्त)ला विजय मिळवून देणारे प्रशांत किशोर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची आज मंगळवारी वांद्रे येथील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकिय पटलावर विविध चर्चांना उधाण आले आहे.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला एकहाती सत्ता मिळवून देण्यात प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा मोठा वाटा होता. मात्र कालांतराने भाजपनधील पक्षश्रेष्ठी आणि किशोर यांच्यात बेबनाव झाल्याने किशोर यांनी भाजपचा कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेसचे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत प्रचाराची रणनीती निश्चित करण्याचे काम हाती घेतले. परंतु उत्तर प्रदेशात किशोर नीती यशस्वी झाली नाही. मात्र बिहारमध्ये सुरुवातीला भाजप आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात असलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या प्रचाराचे काम तेथील विधानसभा निवडणूकीच्या काळात घेतले. त्यात ते यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी संयुक्त दलात प्रवेश केला. त्यामुळे मागील वर्षांपासून प्रशांत किशोर यांच्याकडे भाजप विरोधकच पाहिले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर २०१९ च्या लोकसभा निवडणूका येवू घातलेल्या असतानाच भाजपवर सतत कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न किशोर यांनी केल्याचे दिसून येत आहे. तसेच शिवसेनेच्या आज झालेल्या खासदारांच्या बैठकीला संबोधित केल्याचेही शिवसेनेच्या गोठातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या प्रचाराची धुरा प्रशांत किशोर यांच्या खांद्यावर दिसल्यास नवल वाटावयास नको.  

Check Also

जयराम रमेश यांचे भाकित, मतदानाचे संकेत स्पष्ट, मोदी सरकारला निरोप…

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील १०२ जागांवर झालेले मतदान हे भाजपा व नरेंद्र मोदी सरकारचे शेवटचे दिवस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *