Breaking News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आता अँनिमेशन चित्रपट 'प्रभो शिवाजी राजा' चा जयघोष

मुंबई : संजय घावरे

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तीमत्व !  त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे तसे कठीणच.  त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपणास स्वातंत्र्य आणि स्वाधिनतेचा परिपाठ शिकवतो. शिवाजी महाराजांची हीच जीवनगाथा आता लवकरच  ‘प्रभो शिवाजी राजा’ या अँनिमेशनपटातून लोकांसमोर येत आहे.  गणराज असोसिएट्स प्रस्तूत तसेच इन्फिनिटी व्हीज्युअल आणि मीफॅक निर्मित, या मराठी सचेतनपटातील (अँनिमेटेड फिल्म) शिवरायांचा जयघोष करणारे ‘कणखर बांधा’ हे गाणे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमातील हे गाणे, महाराजांच्या पराक्रमाची अनुभूती रसिकांना देत आहे. गायक श्रीरंग भावे यांच्या शास्त्रीय सुरातून अवतरलेले हे गाणे, प्रकाश राणे यांनी लिहिले असून, स्वराधीश डॉ भरत बलवल्ली यांच्या संगीताचे संस्कार त्याला लाभले आहे. महाराजांची गाथा संक्षिप्तरूपात मांडणाऱ्या या गाण्याला लोकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया देखील पाहायला मिळत आहे. या गाण्याबरोबरच आणखीन सहा गाणी या चित्रपटात असून शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, नंदेश उमप आणि उदेश उमप या गायकांची गाणीदेखील या चित्रपटाच्या आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *