Breaking News

तीन दिवसांत निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसू आ. भातखळकर यांचे महाविकास आघाडी सरकारला अल्टिमेटम

मुंबई : प्रतिनिधी

आपल्या गलथान कारभारामूळे संपूर्ण राज्यातील वीज ग्राहकांना भरमसाठ वीज बीले अदा करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत बीज बिलात सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू असा अल्टिमेटमच भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर काढलेल्या भव्य मोर्चाच्या वेळी बोलताना आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षात असलेला बेबनाव पुराव्यानिशी सर्वांसमोर मांडला. राज्याचे उर्जा मंत्र्यांनी वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे वारंवार आश्वासन दिले. परंतु उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलांत सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांनी नकार दिला आहे. श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे दुष्पाप हे महाविकास आघाडी सरकार करीत आहे. परंतु जो पर्यंत राज्यातील जनतेला ३०० युनिट पर्यंतची सवलत व वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही तो पर्यंत भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन असेच सुरू राहील, असा इशारा सुध्दा त्यांनी दिला.

तसेच, कोरोनाच्या काळात भरमसाठ व अंदाजे वीज बील अदा करणाऱ्या ठाकरे सरकारला आगामी काळात महाराष्ट्रातील जनता ‘शॉक’ दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्ंयांनी व्यक्त केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *