Breaking News

पीओपीच्या मुर्त्या तयार करण्यास अखेर परवानगी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना केलेली विनंती मान्य

मुंबई : प्रतिनिधी

पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत.त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मुर्तीवर बंदी राहणार नाही, अशी माहिती भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.

महाराष्ट्रातील सुमारे  लाख मुर्तीकार, कारागीरांचे गाऱ्हाणे आज  पुन्हा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मांडले. महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे त्यामुळे याबाबत तोडगा काढावा अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी मंत्री जावडेकर यांना केली.

पीओपीवरील बंदी मुळे हजारो गणेश आणि दुर्गा मुर्तीकार अडचणीत आले आहेत.  या व्यवसायात ५ लाखाहून अधिक कारागीर, मुर्तीकार, कारखानदार यांचा रोजगार अवलंबून आहे. कोरोना मुळे यावर्षी हा उद्योग अडचणी आला आहे. त्यामुळे याबाबत तोडगा निघावा, अशी विनंती करीत नुकतेच मुर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे शिष्टमंडळाने आमदार अॅड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड नरेश दहिबावकर महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

त्यावेळी अभ्यास गट स्थापन करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण विभागाने दिल्ली आयआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. के. के. पंत, प्रो. सी बालोममुमदार यांच्या सह पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेच्या डाँ शुभांगी उंबरकर, डाँ. मोहन डोंगरे  यांच्यासह वॉटर क्वलिटी मॅनेजमेंट विभागाचे सेक्रेटरी जे. चंद्राबाबू  यांची कमिटी गठीत केली. त्यामुळे या समितीचा अहवाल येईपर्यंत बंदीला स्थगिती देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *