मुंबईः प्रतिनिधी
बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. मात्र त्या प्रकरणाची अवस्था नो वन किल्ड जेसिका या सटायर फिल्म सारखी असल्याचा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित संसदीय कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.
अर्थसंकल्पिय अधिवेशन चार आठवड्याचे घ्यावे अशी आमची मागणी होती. मात्र राज्य सरकारकडून अधिवेशन जास्त कालावधी चालावे अशी नसल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात पहिल्यांदाच ७५ लाख नागरीकांना वीज तोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडून नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष पदावरून ते म्हणाले की, सरकारकडे भक्कम पाठिंबा आहे. परंतु सरकार घाबरत असून सरकारचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नसल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपालांनी सरकारला पाठविलेल्या पत्रावर ते म्हणाले की, राज्यपालांना विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख निश्चित करण्याचा अधिकार असून त्याच अधिकारातून त्यांनी पत्र पाठविल्याचे सांगत राज्यपालांच्या पत्राचे फडणवीस यांनी समर्थन केले.
