Marathi e-Batmya

जगमोहन रेड्डी यांच्या भगिनीला शर्मिला यांना आंध्रमधून काँग्रेसची उमेदवारी

काँग्रेसने मंगळवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी वायआरएस काँग्रेसचे प्रमुख तथा मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या भगिनी वायएस शर्मिला यांना राज्याच्या कडप्पा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी काँग्रेसने आज जाहिर केली.

वायएस शर्मिला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या बहीण आहेत, वायएसआर तेलंगणा पक्षाचे (वायएसआरटीपी) पक्षात विलीनीकरण जाहीर केल्यानंतर जानेवारीमध्ये राज्याच्या काँग्रेस प्रमुखपदी नियुक्त करण्यात आले.

काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांच्या नव्या यादीत आंध्र प्रदेशातील पाच, बिहारमधील तीन, ओडिशातील आठ आणि पश्चिम बंगालमधील आणखी एका उमेदवाराचा समावेश आहे.

तर विधानसभेच्या निवडणूकीसाठीही उमेदवारांची यादी जाहिर केली. ती खालीलप्रमाणे….

 

Exit mobile version