संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराड यास पुढील पोलिस कोठडीसाठी आणि मकोका कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यासह इतर कायदेशीर बाबीप्रकरणी आज केज येथील न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी केजच्या न्यायालयाने देशमुख हत्या प्रकरणातील सात आरोपांवर या आधीच मकोका कायदा लावला होता. त्यानंतर आज आठवा आरोपी म्हणून वाल्मिक कराड याच्यावरही मकोका कायदा लावला. त्यानंतर परळीमधील बाजारपेठ वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी बंद केली. तसेच मकोका कायदा मागे घ्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरु केले. विशेष म्हणजे या आंदोलनात वाल्मिक कराड याच्या मातोश्रीसह त्याचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.
वाल्मिक कराड याच्यावर लावण्यात आलेला मकोका कायदा मागे या मागमीसाठी वाल्मिक कराड समर्थकांनी परळीतील पोलिस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलकांकडून वाल्मिक कराड याला जाणीवपूर्वक खूनाच्या खटल्यात गुंतवण्यात येत असल्याचा आरोप केला. यासाठी जो कट रचण्यात आला, त्या कटातंर्गतच राज्याच्या वाल्मिक कराड याच्यावर मकोका खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जोपर्यंत वाल्मिक कराड याच्या विरोधात मकोका खाली दाखल केलेला मकोका गुन्हा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणारच नाही असे सांगत त्याच्या कुटुंबियांनी भूमिका घेतली. त्याचबरोबर मराठा आणि वंजारी या जातीत तेढ निर्माण करण्यासाठीच हे कट कारस्थान करण्यात येत असल्याचा आरोपही वाल्मिक कराडच्या समर्थक आणि कुटुंबियांनी यावेळी केला.
दरम्यान, वाल्मिक कराड यांच्या समर्थक आणि कुटुंबियांनी सुरु केलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यासाठी काही पोलिस अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत वाल्मिक कराड च्या कुटुंबियांनी माघार घेण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र समर्थक आणि कुटुंबियांनी आंदोलनातून माघार घेण्यास नकार दिला.